India vs Pakistan, Asia Cup 2023 : सर्वांना प्रतिक्षा लागलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याला (IND vs PAK) आता फक्त काही तास शिल्लक आहेत. दुबळ्या नेपाळला हरवल्यानंतर पाकिस्तानचा संघ आता भारताविरुद्ध मजबूत आघाडी घेऊन उतरेल. तर टीम इंडिया (Team India) देखील पहिल्याच सामन्यात तगड्या बॉलिंग लाईनअपविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे संघात कोणाला संधी मिळणार? बाबर आझम (Babar Azam) विरुद्ध प्लॅन काय असेल? तर शाहीन अफ्रिदीला टीम इंडियाकडे उत्तर काय असेल? असा सवाल विचारला जात आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघाकडे पाहिलं तर प्लेईंग इलेव्हन नक्की कशी असेल, यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. मात्र, रोहित शर्मा (Rohit Sharma) पाकिस्तानविरुद्ध हुकमी एक्का उतरवणार असं दिसतंय
कसं असेल टीम इंडियाचं समीकरण?
केएल राहुल (KL Rahul) पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही, असं कोच राहुल द्रविड यांनी आधीच जाहीर केलं होतं. त्यामुळे आता मिडल ऑर्डरचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. केएल राहुल खेळणार नाही. त्याच्याजागी विकेटकीपर म्हणून इशान किशनला संधी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तर श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांना देखील संघात घेतलं जाईल. त्यामुळे आता सूर्यकुमार यादवचा पत्ता कट झाल्याचं दिसतंय. तर पाकिस्तानविरुद्ध सर्वात यशस्वी ठरलेल्या भुवनेश्वर कुमारला आशिया कपविरुद्ध (Asia Cup 2023) संधी मिळाली नाही. पाकिस्तानविरुद्ध स्विंग अटॅक महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे शार्दुल ठाकूर पाकिस्तानविरुद्ध एक्स फॅक्टर ठरण्याची शक्यता आहे.
Lights Camera
ActionRelated News
Have a look at #TeamIndia‘s fun-filled Headshots session ahead of #AsiaCup2023
— BCCI (@BCCI) September 1, 2023
सलामीचे वांदे…
कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल आणि इशान किशन या तिघांना संघात घेतलं तर सलामीसाठी कोण येणार? हा मोठा प्रश्न आहे. त्यावर टीम मॅनेजमेंट कोणता निर्णय घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. सामना आहे दुश्मन देशाविरुद्ध आणि तरुण खेळाडूंना सलामीला पाठवणं थोडं अवघड जाऊ शकतं. त्यामुळे आता कोच आणि कॅप्टनचा निर्णय सामन्याच्या निकालावर परिणाम ठरू शकतो.
दरम्यान, बॉलिंगबद्दल बोलायचं झालं तर, शार्दुल आणि बुमराहची जागा पक्की असेल. त्याचबरोबर रोहित शर्मा मोहम्मद शमीवर विश्वास ठेवण्याची शक्यता आहे. तर जडेजा आणि अक्षर फिरकीची बाजू सांभाळतील. तर पीचचा अंदाज घेऊन कुलदीपची जागा निश्चित होईल.
रोहित शर्मा, शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.