टी-20: भारत-विंडीज आज दुसरा सामना; विंडीजची आघाडी, भारतासमोर वर्कलोड मॅनेजचे आव्हान; 8 दिवसांत 4 टी-20

  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Windies Meet Again Today; Windies Lead, Challenges Of Manage Workload Ahead Of India; 4 T 20 In 8 Days

दिव्य मराठी नेटवर्क | प्रोव्हिडेंस2 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

सलामीच्या पराभवातून सावरलेला भारतीय संघ आता यजमान विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेमध्ये बरोबरी साधण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि विंडीज संघांत आज रविवारी दुसरा सामना खेळवला जाणार आहे. यजमान विंडीज संघाने विजयी सलामी देत या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. यामुळे भारतीय संघाने आता मालिकेत बरोबरी साधण्यासाठी कंबर कसली आहे.

Related News

सामन्याचे थेट प्रक्षेपण रात्री 8.00 वाजेपासून

मात्र, यादरम्यान टीम इंडियाला वाढत्या वर्कलोडला मॅनेज करण्याच्याही आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. टीम इंडिया आठवडाभरामध्ये चार टी-२० सामने खेळत आहे. यादरम्यान टीम इंडियाला दोन देशांचा प्रवासही करावा लागणार आहे. यामुळे या सातासमुद्रापारच्या प्रवासातून भारताला विजयश्री खेचून आणावा लागणार आहे. यामुळे भारतीय संघाच्या विजयाची मदार ही युवा खेळाडूंवर असणार आहे.

आता खेळपट्टीवर फलंदाजांची कसरत

प्रोव्हिडेंस स्टेडियममध्ये धावा काढणे, हे आतापर्यंत सर्वच संघांसाठी अाव्हानात्मक ठरले अाहे. येथील पिच ही अाव्हान देणारी अाहे. या ठिकाणी अातापर्यंत ११ टी-२० सामन्यांत पहिल्या डावात सरासरी १२३ धावा झाल्या. ५ वेळा लक्ष्यचा पाठलाग करणारा संघ विजेता ठरला. ३ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले अाहेत. तसेच तीन सामन्यांवर पावसाचे पाणी फेरले गेले. भारतीय संघ या मैदानावर दुसऱ्यांदा खेळत अाहे. भारताने २०१९ मध्ये ७ गड्यांनी विंडीजवर मात केली हाेती.

दर्जेदार खेळीतून आशिया कपपूर्वी फलंदाज आत्मविश्वास दुणावणार

भारतीय संघाचे फलंदाज हे अाशिया कपपूर्वीच अात्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी उत्सुक अाहेत. यासाठी त्यांना दर्जेदार खेळीतून माेठे यश संपादन करता येणार अाहे. त्यामुळे या खेळाडूंना या मालिकेदरम्यान लक्षवेधी खेळी करावी लागेल. सध्या हार्दिक पंड्या अाणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव लक्षवेधी खेळी करत अाहे. त्यांच्याशिवाय शुभमन, सॅमसन, ईशान किशन यांनाही कामगिरीचा दर्जा उंचवावा लागणार अाहे. यादरम्यान पदार्पणात तिलक वर्माची कामगिरी काैतुकास्पद ठरली. त्याने सलामीच्या टी-२० सामन्यामध्ये २२ चेंडूंत ३९ धावांची खेळी केली. मात्र, भारताचे इतर अायपीएल स्टार या सलामी सामन्यात अापली छाप पाडू शकले नाहीत. सूर्यकुमार यादव अाणि सॅमसनकडून अाता माेठ्या खेळीची अाशा अाहे. भारताचे फलंदाज सलामीच्या सामन्यात डेथ अाेव्हर्समध्येच अपयशी ठरले. यामुळे अाता याच फलंदाजांना या दरम्यान दर्जेदार खेळी करावी लागेल. अावेश खान अाणि उमरान मलिकला दिलेली संधीही संघासाठी फायदेशीर ठरेल, असे चित्र अाहे.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *