Talathi Exam: तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर, 11 लाख उमेदवारांची 3 टप्प्यात परीक्षा

Talathi Recruitment Exam: तलाठी भरतीला राज्यभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. 1000 रुपये अर्ज शुल्क असून राज्यातील लाखो उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली आहे. हे उमेदवार गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षेच्या तारखा जाहीर होण्याची वाट पाहत होते. त्यांच्यासाठी आता महत्वाची अपडेट आहे. भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी भरती परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 

तलाठी ग्रुप सी पदाची परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत.  उमेदवारांना परीक्षेच्या दहा दिवस आधी परीक्षा केंद्राचा तपशील पाठविण्यात येणार आहे. यामुळे उमेदवारांना परीक्षा केंद्रावर आधी पोहोचणे शक्य होणार आहे. राज्यात तलाठी पदाच्या एकूण 4 हजार 466 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी 11 लाख 10 हजार ५३ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे या परीक्षेचा निकाल खूप अटीतटीचा असणार आहे. 

11 लाख उमेदवारांना परीक्षेवेळी कोणती अडचण येऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ही परीक्षा 3 सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. यानुसार सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि सायंकाळी 4.30 ते 6.30  या तीन सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल. 

Related News

भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, ‘ही’ घ्या अर्जाची लिंक

तलाठी भरती परीक्षेचा पहिला टप्पा 17,18,19,20,21,22 ऑगस्ट या कालावधीत पार पडेल. तर दुसरा टप्पा 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत होईल. तर 4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीत तिसरा टप्पा घेण्यात येणार आहे.

जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार 23,24,25 ऑगस्ट तसेच 2,3,7,9,11,12 आणि 13 सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली 

तलाठी भरती परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका नसेल. राज्यातील सर्व जिल्हातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.

TMC Job: ठाणे पालिकेत पुन्हा भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल ‘इतक्या’ पगाराची नोकरी

परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरव्यवहाराची मागील उदाहरणे पाहता महाराष्ट्र शासनाने महत्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा टीसीएस कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. 

तलाठी भरती परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरल्यास ते बाद करण्यात येतील याची नोंद घ्या.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *