पिंपरी : सायबर चोरट्यांच्या रडारवर करदाते | महातंत्र

संतोष शिंदे

पिंपरी :सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळ्या आमिषांना बळी पाडल्यानंतर सायबर चोरट्यांनी आपला मोर्चा आता ‘टॅक्स पेअर’ नागरिकांकडे वळवला आहे. टॅक्स बेनिफिट रिफंड करण्याच्या बहाण्याने चोरटे नागरिकांचे बँक खाते रिकामे करीत असल्याचा प्रकार समोर येऊ लागला आहे. त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

चुकीची माहिती सांगून फसवणूक
टॅक्स पेअर्स ज्या वेळी इन्कम टॅक्स रिटर्न (खढठ) दाखल करतात. त्यात आपला रिफंड परत मिळवण्यात काही दिवस लागतात. अनेकदा एक ते 4 महिन्यांची वेळ पण लागू शकते. याचा गैरफायदा काही सायबर गुन्हेगार घेत आहेत. ते चुकीची माहिती सांगून लोकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे सायबर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

…अशी आहे मोडस ऑपरेंडी
नागरिकांना इन्कम टॅक्स रिफंडसाठी अर्ज सबमिट करण्यास सांगितले जात आहे. यासाठी एक लिंक पाठवून त्याद्वारे वेबपेजवर रि-डायरेक्ट केले जाते. नवीन उघडलेले वेबपेज हुबेहूब आयकर ई-फायलिंग वेब पेजसारखे दिसते. यातील विशेष बाब म्हणजे फ्रॉड करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, एचडीएफसी , अ‍ॅक्सिस बँक (उळी इरपज्ञ) आणि पंजाब नेशनल बँक यांच्या नावाचा वापर केला जात आहे. त्यामुळे मोबाईलवर बोलणार्‍या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते.

ऑनलाईन तक्रारींत वाढ
सायबर फ्रॉड ऑनलाईन तक्रारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील सात महिन्यांत पिंपरी- चिंचवड सायबर सेलकडे सुमारे साडेसात हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वाढत्या तक्रारी लक्षात घेता नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅक्स पेअर नागरिकांना बनावट लिंक पाठवून त्यांची फसवणूक झाल्याचे राज्यात काही ठिकाणी उघडकीस आले आहे. त्यामुळे नागरिकांनी लिंक तसेच मेल तपासून घ्यावेत. कोणत्याही लिंकवर किंवा वेबसाईटवर जाऊन टॅक्सबाबत व्यवहार करू नये. त्यासाठी शासकीय अधिकृत वेबसाईट टाईप करून उघडावी. तसेच, आपण योग्य वेबसाईट उघडली आहे का नाही, याबाबत खातरजमा करावी.
                        – डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल 

हेही वाचा :

पुणे : बागायत 10, जिरायत 20 गुंठ्यांपर्यंत खरेदी करता येणार

नगर : सरकारी कर्मचार्‍यांची मोटरसायकल रॅली

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *