ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलसाठी टीम इंडियाची Playing XI जाहीर, ‘या’ खेळाडूंना संधी

India vs Australia, World Cup Final 2023: विश्वचषकावर तिसऱ्यांदा नाव कोरण्यापासून टीम इंडिया (Team India) आता फक्त एक पाऊल दूर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडणार आहे. (India vs Australia) ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टीम इंडिया पहिली बॅटिग करणार आहे. अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाने प्लेईंग इलेव्हन (Playing XI) जाहीर केली आहे. रोहित शर्मा (कर्णधार) शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मस सिराज या खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. 

अंतिम सामन्याची उत्सुकता
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडिअम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Ahmedabad, Narendra Modi Stadium) अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. भारत या स्पर्धेत अपराजीत आहे. सलग दहा सामने जिंकत टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर सलग आठ सामन्यात विजय मिळवत सेमीफायनमध्ये धडक मारली आहे.

अहमदाबादमध्ये बनणार विक्रम
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी जगातल्या या सर्वात मोठ्या स्टेडिअमवर एक लाखाहून अधिक प्रेक्षकांची उपस्थिती राहणार आहे. 2015 मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात फायनल खेळवण्यात आली. या सामन्यासाठी एमआयजी ग्राऊंडवर तब्बल  93,013 प्रेक्षकांची नोंद करण्यात आली होती. पण नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा विक्रम मागे पडला आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअमची प्रेक्षक संख्या 132000 इतकी आहे. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याासाठी तिकिटं हाऊसफूल झाली आहेत. अंतिम सामन्यासाठी मोदी स्टेडिअम प्रेक्षकांनी खचाखच भरलंय. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीचा नवा विक्रम प्रस्तापित झाला आहे. 

Related News

2011 विश्वचषकात भारत-ऑस्ट्रेलिया
विश्वचषक 2011 मध्ये अहमदाबादच्या याच मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान क्वार्टर फायनलचा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताने 5 विकेट राखून ऑस्ट्रेलियावर मात केली आणि सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. ऑस्ट्रेलियाने 6 विकेट गमावत 50 षटकात 260 धावा केल्या. तर भारताने हे आव्हान 5 विकेटच्या मोबदल्यात 47.5 षटकात पूर्ण केलं. यानंतर सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला. तर फायनलमध्ये भारताने श्रीलंकेला धुळ चारत 28 वर्षांनी विश्वचषक उंचावला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. 

आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वचषक उंचावणार का याकडे करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *