वर्ल्ड कप पराभवाचा बदला घ्या! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 साठी टीम इंडियाची Playing XI ठरली

Ind vs Aus T20 Series : विश्वचषक स्पर्धेनंतर लगेचच भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान टी20 मालिकेला (India vs Australia T20 Series) सुरवात होणार आहे. येत्या 23 नोव्हेंबरपासन भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) 15 खेळाडूंच्या टीम इंडियाची (Team India) घोषणा केलीय. विश्वचषकात खेळणाऱ्या अनेक दिग्गज खेळाडूंना टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आलीय. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली सामना येत्या 23 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अद्यापही दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे टीम इंडियाची धुरा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. 

टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन
विश्वचषकात खेळलेल्या केवळ दोन खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत संधी देण्यात आली आहे. यात सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनचा समावेश आहे. उर्वरीत सर्व खेळाडू नवे आहेत. या खेळाडूंमधून कर्णधार सूर्यकुमार यादवला बेस्ट प्लेईंग निवडावं  लागणार आहे. याउलट विश्वविजेता ऑस्ट्रेलिया संघ एकदोन बदल वगळता पूर्ण ताकदीनिशी खेळणार आहे. टी20 सामन्यात भारतीय डावाची सुरुवात ईशान किशन आणि यशस्वी जयस्वाल करण्याची शक्यता आहे. तर तिसऱ्या क्रमांकवर ऋतुराज गायकवाड आणि चौथ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाड फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. 

वेगवान गोलंदाजीची मदार प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंहवर असेल तर फिरकीची जबाबदारी वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलवर असेल.

Related News

अशी असेल प्लेईंग इलेव्हन
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़ (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर) , यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा.

भारत-ऑस्ट्रेलिया टी20 सामन्यांचं वेळापत्रक
पहिला टी20 सामना – 23 नोव्हेंबर संध्याकाळी 7.00 वाजता, विशाखापट्टणम
दुसरा टी20 सामना – 26 नोव्हेंबर संध्याकाळी 7.00 वाजता, तिरुवनंतपुरम
तिसरा टी20 सामना – 28 नोव्हेंबर  संध्याकाळी 7.00 वाजता, गुवाहाटी
चौथा टी20 सामना – 1 डिसेंबर  संध्याकाळी 7.00 वाजता,  नागपूर
पाचवा टी20 सामना – 3 डिसेंबर  संध्याकाळी 7.00 वाजता, हैदराबाद

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय टी20 संघ 
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *