‘टॉस’ला ४२ रुपये असलेला टीम इंडियाचा ‘भाव’ ९ वा. घसरून: क्रिकेटप्रेमींचा झाला हिरमोड, बुकी मात्र मालामाल; सट्टेबाजारास लगाम लावण्यात पोलिस यंत्रणा ठरली कुचकामी

मंदार जोशी | छत्रपती संभाजीनगर33 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

वर्ल्डकप मॅच पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी स्क्रीन लावल्या होत्या. पण, सामना निसटत असताना रसिकांनीही काढता पाय घेतला. निराश झालेल्या क्रिकेटप्रेमींनी फटाक्यांचे बॉक्स न फोडताच परत नेले. छाया : मनोज पराती

  • हॉटेलांसह गल्लोगल्ली लागल्या होत्या स्क्रीन, फटाक्यांच्या माळा नेल्या परत

वर्ल्डकपचा रविवारी झालेला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी निराशाजनक ठरला. मात्र, शहरातील बुकींसाठी हा सामना मालामाल करणारा ठरला. पहिल्यापासून बुकीने भारताच्या संघाला फेव्हरेट करीत ४२ रुपये भाव सुरुवातीला लावला होता. रात्री नऊ वाजेपर्यंत हा भाव दोन रुपयांवर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत बुकींवर लगाम ठेवून असलेली पोलिस यंत्रणा मात्र या वेळी सपशेल अपयशी ठरली. त्यामुळे अनेक सामान्यांचे पैसे बुकींच्या खिशात गेले. सामना सुरू झाला तेव्हा बुकींनी भारतासाठी ४६ रुपये भाव लावला होता. भारत जिंकला व ४२ रुपये लावले तर १०० रुपये मिळतील. त्यात भारताला बॅटिंग मिळाल्यामुळे अनेकांनी धडाधड भारतावर पैसे लावले. सुरुवातीला रोहित शर्मा याने चांगल्या धावा करण्यास सुरुवात केली तेव्हा भारत चांगली कामगिरी करणार असे अनेकांना वाटले. त्यामुळे भारत किमान ३२५ धावा करेल या बुकींच्या बोलीवर पुन्हा अनेकांनी पैसे लावले. मात्र रोहित, शुभमन गिल अन् त्यानंतर विराट कोहली हे आऊट झाल्यानंतर अनेकांनी देव पाण्यात ठेवले. अखेर नऊ वाजेच्या सुमारास भारतीय टीमचा भाव ४२ वरून दोन रुपयांवर आला.

Related News

दोघांना ताब्यात घेतले अन्् सोडूनही दिले

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *