तेंडल्याचा अविस्मरणीय षटकार: सचिनच्या अनोख्या शिल्पाचे उद्या वानखेडेवर अनावरण; 8 महिने चालले काम, जपानहून आणला क्ले!

मुंबई3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

साऱ्या जगभराचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती अनोख्या शिल्पाचे उद्या 1 नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर अनावरण होत आहे. शेन वॉर्नला षटकार खेचतानाची पोज असलेले हे शिल्प अहमदनगरचे चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारले आहे.

Related News

सचिनच्या या शिल्पाची उंची 22 फूट आहे. तेंडल्याच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त मुंबई मुंबई क्रिकेट असोसिएशनने ही अनोखी भेट त्याला आणि त्याच्या चाहत्यांना दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या शिल्पाचे लोकार्पण होईल.

सचिनच्या शिल्पाची उंची बावीस फूट आहे.

सचिनच्या शिल्पाची उंची बावीस फूट आहे.

कसे आहे शिल्प?

ब्रांझ अर्थातच कास्यापासून या शिल्पाची निर्मिती केलीय. या शिल्पाची एकूण उंची 22 फूट असेल. त्यात सचिनच्या मुख्य मूर्तीची उंची 10 फूट, तर त्याच्या हातात तळपणाऱ्या बॅटची उंची 4 फूट आहे. या मूर्तीखाली क्रिकेटचा चेंडू असेल. जगाचे चिन्ह म्हणून त्याची निर्मिती केलीय. त्यावर रमेश तेंडूलकर यांचे नाव कोरलेले आहे. विशेष म्हणजे या चेंडूच्या पॅनलवर तेंडल्याने घातलेल्या विक्रमांच्या रतिबाचा उल्लेख असेल. वानखेडेमध्ये हे भव्यदिव्य शिल्प क्रिकेटप्रेमींना पाहता येईल.

तेंडल्याच्या शिल्पावर तब्बल आठ महिने काम चालले.

तेंडल्याच्या शिल्पावर तब्बल आठ महिने काम चालले.

आठ महिने काम

अहमदनगरचे चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळी यांनी या अनुपम शिल्पाची निर्मिती केलीय. त्यांनी अयोध्येतल्या राम मंदिराचे कामही केलेय. विशेष म्हणजे कांबळे यांचे सचिनशी जुने संबंध आहेत. या कलाकृतीच्या निर्मितीसाठी या दोघांची पुन्हा एकदा भेट झाली. अहमदनगर येथील स्टुडिओमध्ये कांबळे यांनी आठ महिन्यात हे शिल्प साकारले. सचिनचा भाऊ अजितने त्यांना या कामासाठी तेंडल्याचे अनेक बारकावे सांगितले. यासाठीचा क्ले, साहित्य चक्क जपानहून मागवल्याचे समजते.

शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी ही कलाकृती साकारली आहे.

शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी ही कलाकृती साकारली आहे.

येथेच स्वप्नपूर्ती झाली

सचिन तेंडुलकरने 1998 वानखेडे येथे पहिला रणजी सामना खेळला. त्यामुळे सचिनच्या आवडीचे हे ठिकाण आहे. या ठिकाणच्या त्याच्या खूप आठवणी असून, वानखेडेवर शिल्प उभारणे हे आपल्यासाठी मोठी गोष्ट असल्याची प्रतिक्रिया यापूर्वीच सचिनने दिली होती. 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच खेळला गेला. या सामन्यात भारताने श्रीलंकेला धूळ चारली. विश्वचषक जिंकणारा भारत पहिला यजमान संघ ठरला. याआधी कोणत्याही संघाने स्वतःच्या भूमीवर विश्वचषक जिंकला नव्हता. यासह सचिन तेंडुलकरचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

प्रमोद कांबळे यांनी या शिल्पाची छोटी प्रतिकृती सचिनला दिली.

प्रमोद कांबळे यांनी या शिल्पाची छोटी प्रतिकृती सचिनला दिली.

अविस्मरणीय भेट

मुंबई क्रिकेट असोसिएशनने यापू्रवी सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर यांच्या सन्मानार्थ अनुक्रमे कॉर्पोरेट बॉक्स आणि स्टँड उभारण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, देशातल्या काही मोजक्या क्रिकेट स्टेडियमध्ये क्रीडापटूंचे पुतळे आहेत. आता सचिन जिथे खेळला, तिथेच हे अनुपम असे शिल्प साकारले असल्याने ही एक अविस्मरणीय भेट त्याच्यासाठी असेल.

दुसरा क्रिकेटपटू

सचिन हा भारतातील दुसरा क्रिकेटपटू असेल ज्याचा पुतळा बसवला जाईल. आतापर्यंत तीन वेगवेगळ्या ठिकाणी भारताचे माजी कर्णधार कर्नल सीके नायडू यांचाच पुतळा बसवण्यात आला आहे. यामध्ये इंदूरमधील होळकर स्टेडियम, नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए) स्टेडियम आणि आंध्रमधील व्हीसीडीए स्टेडियमचा समावेश आहे.

कर्नल सीके नायडू

कर्नल सीके नायडू

द्रविडच्या नावाने भिंत

बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडच्या नावावर एक भिंत आहे. ज्यावर वचनबद्धता, वर्ग आणि सातत्य असे तीन शब्द लिहिलेले आहेत. हे तीन शब्द राहुल द्रविडच्या व्यक्तिमत्त्वाचे अतिशय उत्तम वर्णन करतात.

बंगळुरूतल्या स्टेडियमवर राहुल द्रविडच्या नावाने उभारलेले भिंत.

बंगळुरूतल्या स्टेडियमवर राहुल द्रविडच्या नावाने उभारलेले भिंत.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *