अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांचे समीर भुजबळांकडून पुरावे सादर करत खंडन | महातंत्र

नाशिक, महातंत्र वृत्तसेवा : मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांताक्रुझ येथील निवासस्थानाच्या जागेबाबत गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, दमानिया यांच्या आरोपांचे राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांच्याकडून खंडन करण्यात आले आहे. याबाबत भुजबळ यांनी पुरावे सादर केले आहेत.

भुजबळ म्हणाले, आमच्या सांताक्रुझ येथील घराबाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहे. मात्र, वस्तिस्थितीत अशी आहे की, ही जागा बॉमबे ख्रिश्चन ट्रस्टच्या मालकीची असून फ्रान्सिस फर्नांडिस हे लिझ होल्डर म्हणजे मालक होत. ह्यांनी त्यांची मुलीला लिझचे हक्क शैला अथायडे ह्यांना दिले होते. म्हणजेच त्या ह्या जागेच्या खऱ्या मालक होत्या व त्यांनी या जागेसंबंधी हक्क त्यांचे भाऊ ह्यांना दिले होते. ह्या प्रकरणी कोर्टात फर्नांडिस कुटुंबीयांनी कन्सेंट टर्म्स फाईल करून सर्वप्रथम मेसर्स पाल्म शेल्टर्स ह्या रहेजा बंधूंच्या कंपनीसोबत व्यवहार केला होता. त्यांनी १० वर्षे काहीही काम केले नसल्यामुळे फर्नांडिस हे नव्या डेव्हलपर्सच्या शोधात होते. फ्रेडरिक नर्होणा ह्या सोसायटीच्या सचिवांना नवीन डेव्हलपर शोधावा ह्यासाठी विनंती केली. त्यानुसार आमच्या मेसर्स परवेश कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या संपर्कात ते आले. त्यांनी सर्व विषय मांडला होता.

फर्नांडिस कुटुंबियांना त्याच सोसायटीमध्ये इतरत्र फ्लॅट्स देण्याच्या करारानुसार, आमच्या कंपनीने सर्व मोबदला हा मेसर्स पाल्म शेल्टर्स व फ्रेडरिक नर्होणा ह्यांना दिला होता. त्याबदल्यात सादर जागेसंबंधी सर्व हक्क आमच्या कंपनीस मिळाले होते. मोबदला दिल्यानंतर सप्टेंबर २००३ मध्ये श्री व सौ फर्नांडिस ह्यांनी आमच्या परवेश कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या नावे रजिस्टर सुद्धा केली होती. परंतु, २००५ मध्ये आम्ही बांधकामास सुरुवात केल्यानंतर आमचे फ्रेडरिक नर्होणा ह्यांच्याशी पटत नाही. ह्या कारणास्तव तो करार रद्द करावा, अशी भूमिका घेतली. आम्ही फ्रेडरिक नर्होणा ह्यांच्याशी संपर्क केला असता त्यांचे बांधकाम सुरु आहे व लवकरच त्यांना पझेशन देण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र फेड्रिक नारोना यांच्याकडून फ्लॅट घेण्याबाबत फर्नांडिस कुटुंबीयांनीच नकार दिला, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

आमचे कोणतेही देणं लागत नसताना माणुसकीच्या नात्याने फर्नांडिस कुटुंबीयांशी आम्ही वारंवार संपर्क केला. २०१४ साली त्यांनी समक्ष भेटून फ्लॅटच्या मोबदल्यात पैसे देण्याचे आम्ही मान्य आणि त्यांनी देखील ते मान्य केले. त्यासाठी बॉम्बे ख्रिश्चन ट्रस्टला पत्र सुद्धा दिले की, परवेश कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या नावे लिझ ट्रान्सफर करावी. मात्र त्यावेळेस देखील फर्नांडिस यांनी व्यवहार पार पाडला नाही. आणि पुन्हा पैसे घेण्यास नकार दिला. नंतरच्या काळात आमच्यावर ओढवलेली संकटे पाहत याबाबत फर्नांडिस कुटुंबीय कोर्टात गेले. मात्र कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली आणि त्यांना ट्र्याबूनल (योग्य त्या कोर्टात दाद मागायला ) मध्ये जायला सांगितले. मात्र त्यानंतर देखील त्यांनी ट्र्याबूनल मध्ये दाद मागितली नाही. दरम्यान अंजली दमानिया यांनी फर्नांडिस कुटुंबीयांना पुढे करुन यात राजकारण करत राहिल्या त्यांना पुढे करून फर्नांडीस कुटुंबीयांना कोणताही लाभ घेऊ दिला नाही.आमची तयारी असताना देखील फर्नांडीस कुटुंबीयांनी व्यवहार पार पाडला नाही, असा दावाही भुजबळ यांनी केला.

विशेष बाब म्हणजे मागील वर्षी अंजली दमानिया ह्यांनी सुप्रिया सुळे ह्यांच्या मार्फत संपर्क साधला व त्यांना मध्यस्ती करण्याची विनंती केली होती. याबाबत आम्हाला विचारणा केली असता आमचेकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला, त्यावेळी क्लाउड फर्नांडिस यांचे निधन झाल्याचे आम्हाला समजले तेव्हा सुरुवातीलाच रु. ५० लक्ष चा धनादेश आम्ही विनाअट देऊ केला. तो त्यांनी स्वीकारला परंतु बँकेत जमा केला नाही किंवा त्यांना जमा करू दिला नसावा.

सुप्रिया सुळे ह्यांच्या मध्यस्तीमुळे आणी फर्नांडिस ह्यांचे वय बघता जवळपास सर्व मागण्या किंवा त्यांनी करारानुसार पूर्तता करण्याच्या सर्व अटी-शर्ती आम्ही बाजूस सारून व वकिलांचे सल्ल्यांविरुद्ध फक्त रिलीझ डीड सारखे एखादे करारपत्र करावे व ईडी ट्रिब्युनलमध्ये परवानगीसाठी जावे लागू शकते त्यात त्यांनी सहकार्य करावे असे ठरले व त्यांच्या फ्लॅट च्या बदल्यात आर्थिक स्वरूपात मोबदला देण्याचे ठरले होते. मात्र आम्ही दिलेले पैसे देखील त्यांनी नाकारले.

हेही वाचलंत का?

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *