7978 गोण्यांची झाली आवक: संगमनेर बाजार समितीत कांद्याला 3051 रुपयांपर्यंत मिळाला भाव

अहमदनगर9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी झालेल्या कांदा लिलावात एक नंबर कांद्याला 2600 ते 3051 रुपये असा विक्रमी भाव मिळाला. एकूण 7 हजार 978 गोण्या कांद्याची आवक झाली. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती शंकरराव खेमनर यांनी केले.

संगमनेर कृषी उत्पनन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 2600 ते 3051 रुपये भाव मिळाला आहे. दोन नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 2100 ते 2500 रुपये, तीन नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 1000 ते 1800, गोल्टी कांदाही प्रतिक्विंटल 200 ते 900 रुपयांनी कांदा विकला गेला. यावेळी टोमॅटोचे भाव कोसळले असले तरी 41 हजार कॅरेट आवक होऊन 200 ते 350 रुपये प्रति कॅरेट बाजारभाव मिळाला. डाळिंबाची 1200 कॅरेट आवक होऊन एक नंबर डाळिंबाला प्रतिकिलो 251 ते 385, दोन नंबरला 151 ते 200, तर तीन नंबरला 75 ते 111 रुपये बाजारभाव मिळाला.

फ्लॉवरच्या 118 गोण्यांची आवक होऊन 500 ते 1200 भाव मिळाला. तसेच सोयाबीनला सरासरी 4750, चना 4619 तर ज्वारीला 2501 बाजार भाव मिळाल्याची माहिती सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली. दरम्यान, संगमनेरमध्ये कांद्याला चांगला दर मिळत असल्यामुळे आवकेतही वाढ होण्याची शक्यता बाजार समितीच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. कांदा निर्यातीवरील शुल्क वाढीमुळे मात्र कांद्याच्या भावात काही प्रमाणात घसरण झाली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणताना त्याची ग्रेडिंग करून व साफसफाई करून आणावा, असे आवाहन संगमनेर बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *