औरंगाबादएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद महसूल विभागाचे नामकरण छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धाराशिव जाहीर केले. नामकरणाबाबतची अधिसूचनाही जाहीर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तालय कार्यालयातील बोर्डावर ‘विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर’ लावण्यात आले आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालाचा बोर्ड देखील ‘जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर’ असा लावण्यात आला आहे.
दरम्यान, सुरूवातीला शासनाच्या वतीने जेव्हा या नावाची घोषणा झाली होती. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नावावरुन वाद निर्माण झाला होता. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात देखील गेले होते. मात्र राज्य शासनाच्या निर्णयानंतर जिल्ह्यात सर्वत्र छत्रपती संभाजीनगर बोर्ड पहायला मिळणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एन्ट्री गेटवर अशाप्रकारे फलक लावण्यात आला आहे.
आता छत्रपती संभाजीनगर बोर्ड लागलेले दिसणार
महाविकास आघाडीच्या वतीने शेवटच्या कॅबिनेटमध्ये संभाजीनगर नामकरनाचा ठराव मांडला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारने छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केले होते. मात्र या प्रकरणात न्यायालयात दाद मागण्यात आली होती. त्यामुळे काही काळ हे नामकरण थांबले होते. 15 सप्टेंबर रोजी राज्य सरकारच्या वतीने याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी देखील आता छत्रपती संभाजीनगर हे नाव झाल्याचे घोषित केले. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने कार्यालयावर बोर्ड लावून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आगामी काही दिवसात सर्व ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असे बोर्ड लागल्याचे पाहायला मिळणार आहे.