पुणेकरांसाठी मोठी बातमी; आता एका क्लिकवर मिळणार बसचे लाइव्ह लोकेशन

PMPML buses on Google Maps: पुणेकरांना आता महानगरपालिकेच्या बसचे लाइव्ह लोकेशन कळणार आहे. पुणे महानगर महामंडळाच्या बसचे लाइव्ह लोकेशन व बस किती वेळात येणार याची वेळ आता गुगल मॅपवरुन कळणार आहे. पीएमपीएलकडून या प्रोजक्टवर काम करण्यात येत असून सुरुवातीला पाच डेपोतील 20 बसमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. intelligent transit management system च्या माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात येत आहे. यासाठी पीएमपी आणि गुगल यांच्यात करारदेखील झाला आहे. 

2017 सालीदेखील पीएमपीएलने लाइव्ह लोकेशनची सेवा सुरू केली होती. जपानी कंपनीसोबत तेव्हा करार करण्यात आला होता. परिवहन मंडळाकडून पैसे देण्यास विलंब होत असल्याचे कारण देत दोन वर्षातच जपानी कंपनीने करार मागे घेतला होता. 

पीएमपीतून महिन्याला लाखो प्रवासी प्रवास करतात. याच प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाने आता गुगलसोबत करार केला आहे. गुगलकडून रिअल टाइम लोकेशन भेटल्यास त्यांचा प्रवास सुखाचा होणार आहे. सध्या या प्रकल्पावर काम करण्यात येत असून ट्रायल पिरेडवर ही सेवा सुरू होत आहे. 

Related News

नोव्हेंबर 2022 मध्येच हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र गुगल मॅपवर बस ट्रॅक होण्यास अडचणी येत होत्या. जीपीएसला बसचे मार्ग ट्रॅक होण्यासाठी अचूक लोकेशनची गरज होती. त्यामुळं बरेचसे तांत्रिक काम करणे आवश्यक होते. कारण पीएमपी’च्या बसमध्ये सर्व तांत्रिक गोष्टी बसवण्यात येत आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. 

पीएमपीकडून आत्तापर्यंत 950 बसमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. तर, 650 बसमध्ये अद्याप काम सुरू आहे. सप्टेंबर 15पासून चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी साधारण दोन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. ही सेवा प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी अद्याप नोव्हेंबरचा महिना उजाडणार आहे. पुणेकरांना या दिवाळीत ही खास भेट पीएमपीएलकडून मिळणार आहे, अशी माहिती परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

पीएमपीकडे पूर्वी आयटीएमएस प्रणालीच्या माध्यमातून पीएमपी बसचे लोकेशन मिळत होते. पण ही प्रणाली बंद झाल्यानंतर पीएमपी बसची माहितीच मिळत नव्हती. आता ही नवीन सेवा सुरू झाल्यानंतर बसची सर्व माहिती मिळणार असल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे.  

असा करणार वापर 

प्रवाशांना एखाद्या मार्गावर प्रवास करायचा असेल, तर त्यांनी तो मार्ग ‘गुगल’वर टाकल्यानंतर त्या मार्गावर धावणाऱ्या ‘पीएमपी’ बस, थांबे याची माहिती येईल. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *