मोठी बातमी! 40 व्या दिवशी सरकारला सोडणार नाही, मनोज जरांगेंनी रणशिंग फुंकलं

जालना : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कारण आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा रणशिंगं फुंकले आहे. सरकारला आम्ही 40 दिवसांची मुदत दिली होती, त्यानुसार त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मात्र, 40 व्या दिवशी आम्ही सरकारला सोडणार नाही, असा थेटच इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. 

दरम्यान जालना येथील अंतरवाली सराटी गावात साखळी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “कायदेशीर लढाई म्हणून आंदोलनाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर ते अजिबात होणार नाही. आता आम्हाला वेठीस धरू नका. तसेच 65 लाख अभिलेखापैकी 5 हजार कुणबी नोंदी सापडल्या असतील तर, आरक्षण देण्यासाठी त्या अभिलेखांचे पुरावे भरपूर झाल्या आहेत. तसेच आता सरकारला पुरावे सापडलेत, आम्ही वेळही दिलाय. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचे ते आता सरकारने ठरवलं पाहिजे. पण 40 व्या दिवशी आम्हाला आरक्षण लागते, बाकीचे कारणे सांगू नयेत, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. 

Related News

खरं तर समिती आम्ही नको म्हटलो होतो, तरी सरकारने आमचे ऐकले नाही. आता आमच्यावेळी कायदेशीर अडचणी कशा येतील? असा प्रश्न जरांगे यांनी विचारला. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीररित्या येऊन गेलेत. आम्ही सरकारकडून वेळ घेतला नाही, सरकारनेच आमच्याकडून वेळ मागून घेतला. पण आता आम्हाला कायदेशीर हुलकावण्या दिल्या जातात. मराठ्यांच नुकसान व्हायचं राहिलय कोणते? मराठ्यांच सगळं वाटोळं झालंय. त्यामुळे आता मात्र सोडत नाहीत. आम्हाला शांततेत आंदोलन करायच आहे, पण यासोबतच आरक्षण घेतल्याशिवाय 40  व्या दिवशी सोडणार नसल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 

विरोध करून पापाचे धनी होऊ नका…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन 30 दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र, जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. दरम्यान, 14 सप्टेंबरला सरकारला देण्यात आलेल्या मुदतीचे 30 दिवस पूर्ण होत आहे. त्यामुळे 14 सप्टेंबरला मराठा समाजाची संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर, सर्व पक्षांनी मराठा समाजाच्या गोरगरीब पोरांच्या पाठीमागे राहावं, मराठा समाजाने सर्व पक्षाना सुखात ठेवण्यासाठी 70 वर्ष मदत केली. त्यामुळे याचा विरोध करून पापाचे धनी होऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

तारीख ठरली! 14 ऑक्टोबरला अंतरवाली सराटीत ‘भगवे वादळ’; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *