World Cup बद्दल सर्वात मोठी भविष्यवाणी! सेमी-फायनलमध्ये भिडणार ‘हे’ 4 संघ

ODI World Cup2023: भारतासह जगभरातील क्रिकेटरसिकांना एकदिवसीय विश्वचषकाचे (ODI World Cup) वेध लागले आहेत. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकाची सर्वांनाच उत्सुकता आहे. यावर्षी भारतात विश्वचषक होणार असून भारतीय संघ (Indian Cricket Team) पुन्हा एकदा 2011 च्या विजयाची पुनरावृत्ती करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. पण इतर संघांची सध्याची कामगिरी पाहता भारतासाठी हा प्रवास फार सोपा असणार नाही हे नक्की. त्यातच आता ऑस्ट्रेलियाच्या एका माजी खेळाडूने मोठी भविष्यवाणी केली आहे. विश्वचषकाच्या सेमीफायनमध्ये कोणते चार संघ असतील याचा अंदाज त्याने वर्तवला आहे. 

ऑस्ट्रेलियाला तीन वेळा चॅम्पियनचा किताब मिळवून देणाऱ्या ग्लेन मॅकग्राने विश्वचषकासंबंधी भविष्यवाणी केली आहे. ग्लेन मॅकग्राने वर्ल्डकपच्या सेमीफायनमध्ये कोणते चार संघ पोहोचतील याचा अंदाज वर्तवला असून, यामध्ये भारतीय संघाचाही समावेश आहे. 

‘हे’ चार संघ सेमी फायनलमध्ये खेळणार

ग्लेन मॅकग्राने केलेल्या भविष्यवाणीनुसार, पाच वेळा वर्ल्डकप जिंकणारा ऑस्ट्रेलिया, 1992 वर्ल्डकप विजेता संघ पाकिस्तान, डिफेंडिग चॅम्पियन इंग्लंड आणि दोन वेळा वर्ल्डकप जिंकणारा भारत हे चार संघ सेमी फायनलमध्ये पोहोचतील असा अंदाज वर्तवला आहे. ग्लेन मॅकग्राच्या मते ऑस्ट्रेलियाकडे वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करण्याची सुवर्णसंधी आहे. याचं कारण वर्ल्डकपआधी तयारी करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे पुरेसा वेळ आहे. याशिवाय योग्य संघ तयार करण्यासाठी त्यांच्याकडे अनेक सामने आहेत, ज्याच्या आधारे ते चांगले खेळाडू निवडू शकतात. 

Related News

ग्लेन मॅकग्राने सांगितलं आहे की, ऑस्ट्रेलिया संघ सेमीफायनलमध्ये जागा तयार करणाऱ्या चार संघांपैकी एक असेल. ऑस्ट्रेलियाला मोठ्या स्पर्धांमध्ये खेळणं आणि मोठे सामने खेळणं आवडतं. ते चांगली खेळी करतात आणि त्यांच्याकडे चांगला अनुभवही आहे. याशिवाय संघात काही तरुण खेळाडूही दिसणार आहेत. 

भारत आणि इंग्लंडलाही जागा

ग्लेन मॅकग्राने सांगितलं आहे की, मी या चार संघांमध्ये भारत आणि इंग्लंडलाही जागा देत आहे. इंग्लंड गेल्या काही काळापासून चांगलं क्रिकेट खेळत आहे. याशिवाय पाकिस्तानलाही मी या चार संघात स्थान देत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नुकताच एकदिवसीय वर्ल्डकपसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. यामध्ये मार्नस लाबुशेनला स्थान देण्यात आलेलं नाही. 

ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने संघाची घोषणा केली आहे. संघाची घोषणा करणारा ऑस्ट्रेलिया पहिलाच देश ठरला आहे. आयसीसी वर्ल्ड कप 2023 येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *