पोरानेच झोपेत केले वडिलांवर सपासप वार: हल्ल्यात आईदेखील जखमी; पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील घटना

पुणे9 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

गणेशचतुर्थीला पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोटच्या पोरानेच वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. काम कर, चांगले रहा, असे सांगितल्याने मुलाने वडिलांवर कात्रीने सपासप वार करुन त्यांची हत्या केली आहे. हा संपूर्ण प्रकार पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून समोर आला आहे. या प्रकारामुळे विश्रांतवाडीत सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related News

लक्ष्मण सुरेश मंजुळे (वय -55, रा. मास्टर काॅलनी, टिंगरेनगर,पुणे) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा शिवनाथ लक्ष्मण मंजुळे (वय -20) याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याबाबत शिवनाथचा मामा बाबू दांडेकर (वय -36, रा. टिंगरेनगर,पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी शिवनाथ सध्या शिक्षण घेत नव्हता तसेच कोणता कामधंदे करत नव्हता. त्यामुळे वडील लक्ष्मण यांनी त्याला काम करण्यास सांगितले होते. काम कर, चांगले रहा, असे त्यांनी त्याला वडिलकीच्या नात्याने सांगितले होते. मात्र, मध्यरात्री लक्ष्मण मंजुळे हे गाढ झोपेत होते. त्यावेळी मध्यरात्री दीडच्या सुमारास शिवनाथने झोपेत असलेल्या वडिलांवर घरातील धारदार कात्रीने छाती आणि पोटावर अचानक जीवघेणा वार केले.

या हल्ल्यामुळे पती लक्ष्मण यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून शिवनाथची दुसऱ्या खोलीत झोपलेली आई झोपेतून जागी झाली. त्यावेळी आईने पतीला वाचिण्यासाठी धडपड केली असता, शिवनाथने आईच्या हातावर कात्रीने वार केले. शिवनाथला अटक करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे याबाबत पुढील तपास करत आहेत.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *