मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाजवळ अजित पवार गटाचं आंदोलन,मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी;सूत्र

मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून मंत्रालयात करण्यात आलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान सत्तेत असताना अशी आंदोलनं करणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. दरम्यान मराठा आरक्षणासाठी अजित पवार गटाकडून मंत्रालयासमोर आंदोलन केलं होतं. याच आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीचा अजित पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या आमदारांनी मंत्रालयात प्रवेश करणाऱ्याला गेटलाच टाळं ठोकलं होतं. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मंत्रालयात कामकाज होऊ देणार नाही, अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली होती. या आंदोलकांनी मंत्रालयाशेजारील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आमदारांचे उपोषण सुरु आहे. 

मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं ?

दरम्यान अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या या आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं की, सत्तेत असताना अशी आंदोलन करणं योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनीच अशी आंदोलनं केली तर चुकीचा संदेश जाऊ शकतो. मंत्रालयात असं आंदोलन करणही योग्य नसल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. अशा आंदोलनामुळे महायुतीत समन्वय नसल्याचा मेसेज देखील जाऊ शकतो. महायुती म्हणून अशा परिस्थितीत आपण सर्वांनी एकत्र राहायला हवं. 

हेही वाचा : 

Breaking News : अमोल कोल्हे यांनी भूमिका बदलली, ते अजित पवारांसोबत असल्याचं प्रतिज्ञापत्रक; सुनील तटकरेंचा मोठा दावा

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *