‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला अटक करुन आणा’; कोर्टाने दिले आदेश

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) एका तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक करून न्यायालयात आणण्याचा आदेश कोर्टाने दिले आहेत. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Pune Police) दाखल गुन्ह्यात साक्ष नोंदवण्यासाठी वारंवार बोलावूनही न्यायालयात हजर न राहणाऱ्या माजी पोलीस कर्मचाऱ्याल अटक करून कोर्टात आणण्याचा आदेश शिवाजीनगर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. एस. डी. कांबळे असे निरीक्षकाचे नाव असून ते कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

हानिफ गुलामअली सोमजी (रा. बोट क्लब रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून 20 मे 2013 या दिवशी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात शिवाजी कांतीलाल शिंदे, साईनाथ निवॄत्ती सातव, सोमनाथ काळूराम सातव, विष्णू बाजीराव सातव, ज्ञानेश्वर किसन सातव, निळाराम शितकल (सर्व रा. केसनंद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारहाण करून प्रत्येकी रूपये वीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती, तक्रारदाराच्या कार्यालयात प्रवेश करून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणे आणि जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद होते. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तपास करून 24 सप्टेंबर 2013 मध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी 27 जानेवारी 2017 मध्ये सुरू झाली. आरोपींच्या वतीने ॲड. मिलिंद पवार, ॲड. आकाश देशमुख काम पाहत आहेत. या प्रकरणात सरकार पक्षाने साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. मात्र 2019 पासून खटल्याचे तपासी अंमलदार म्हणून वरिष्ठ निरीक्षक एस. डी. कांबळे यांची साक्ष नोंदवणे बाकी होते. त्यामुळे हा खटला बरेच वर्ष प्रलंबित होता. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने या प्रकरणाचा अहवाल न्यायालयात सादर केला होता.

Related News

तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक कांबळे यांना वारंवार फोन केले, मात्र, ते फोनही उचलत नाहीत. तसेच, पहिल्यांदा काढलेल्या पकड वॉरंटची सूचना त्यांना व्हाटसॲपवर पाठवूनही त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही, असे तक्रारीत नमूद केले होते. या अहवालानंतर सरकारी वकिलांनी न्यायालयात अर्ज करून कांबळे यांना पकडून आणण्यासाठी पकड वॉरंट काढण्यासाठी विनंती केली. ती आता न्यायालयाने मान्य केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एस. पाटील यांनी कांबळे यांनी पुन्हा जामीनपात्र वॉरंट काढले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 नोव्हेंबर 2023 मध्ये होणार आहे.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *