औरंगाबाद2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
युनिर्व्हसल हायस्कुल शाळेच्या मनमानी कारभारला लगाम देत तातडीने शाळेने बंद केलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पर्यायी व्यवस्था करा, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांना शनिवारी दिले.
चिकलठाण्यातील युनिर्व्हसल हायस्कुलने आयटी पार्कसाठी राखीव जमिनीवर शाळा उभारली आहे. शिवाय आरटीईनुसार गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या शासन निर्णयालाही शाळा जुमान नाही. मनमानी कारभारामुळे शाळेची मान्यता रद्द करण्याचा उपसंचालकांनी निर्णय घेतला तरीही काहीच होत नाही. या संदर्भात पुन्हा एकदा शिक्षणाधिकाऱ्यांना डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, अॅड. पंकज गाडेकर, अॅड. अमित सरोसिया, आसिफ शेख आणि राहुल राऊत यांनी दिले.
यानंतर शनिवारी याची दखल घेत शिक्षण उपसंचालक साबळे यांनी पत्राद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले असून, या पत्रात म्हटले आहे की, शाळा व्यवस्थापनाने व्यथित पालकांच्या पालक प्रतिनिधीच्या मुलांचे एप्रिल २०२३ पासून शिक्षण बंद केले आहे. विभागाद्वारे अनेकदा शाळेच्या व्यवस्थापनास याबाबत समज व ताकीद देऊनही शाहा व्यवस्थापन सुडबुद्धीने प्रतिनिधी पालकांच्या मुलांचे शिक्षण सुरु कररण्यास नकार देत आहे. सदर शाळेची मान्यता रद्द करुन सर्व मुलांचे इतरत्र समायोजन करण्याची शिफारस विभागाद्वारे यापूर्वीच कररण्यात आली आहे.
तथापि सदर पालकांच्या तक्रारी आणि सचिवांनी दिलेल्या शिफारसीस मंजूरी मिळे पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शाळेने बंद केले आहे. त्यांचे शिक्षण बाधित होऊ नये. ते शिक्षणाासून वंचित राहू नये. याकरिता तातडीने शिक्षणाची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. पालक प्रतिनिधींनी शुल्क नियामक समितीसमोर व शाळेच्याविरुद्धच्या अन्य न्यायालयीन प्रकरणात शाळेच्या सर्व पालकांचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यामुळे या पालकांचे कोणतेही हक्क बाधित होऊ न देता, विशेष बाब म्हणून या पालकांना सोयीच्या अशा अन्य शाळेच्या मुख्याध्यापकांशी बोलून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची तातडीने तात्पुरती व्यवस्था करण्यात यावी असेही साबळे यांनी दिलेल्या आदेश पत्रात म्हटले आहे.