आरक्षणाला विरोध: फडणवीस, पवार, भुजबळ, राणे, सदावर्तेंची काढली अंत्ययात्रा; ‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणांनी परिसर दणाणला

छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

सकल मराठा समाजाच्या वतीने एसबीओए शाळेजवळ पाच नेत्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. शहरातील कॉलनी-कॉलनीत अामरण, तर कुठे साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

  • मराठा समाजाचा वाढताेय रोष; जरांगे यांच्या भेटीसाठी शहरातून दुचाकी रॅली

मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. रविवारी मयूर पार्क परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने जळगाव रस्त्यावरील एसबीओए शाळेजवळ राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, खा. नारायण राणे आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवण्यात आला. ही मंडळी मराठा आरक्षणाला विरोध व उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत असल्याने हे आंदोलन केल्याचे या वेळी सांगण्यात आले. “एक मराठा, लाख मराठा,’ ‘आरक्षण आमच्या हक्काचे…’ अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता. सरकारने ४० दिवसांच्या अवधीत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावलेला नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे २५ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. रविवारी उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे. मात्र, अद्याप सरकारकडून संवाद साधण्यात आलेला नाही किंवा कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे.‎

Related News

आरक्षणाचा प्रश्न मार्गी‎लावण्याऐवजी उलट

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *