World Cup साठी भारतीय संघ निश्चित! मध्यरात्रीच्या बैठकीत निर्णय; संजूला डच्चू तर 15 खेळाडूंमध्ये…

India World Cup Squad Finalised: भारतात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने 15 सदस्यांचा संघ निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक 2023 च्या स्पर्धेत झालेल्या सामन्यानंतर निवड समितीची बैठक झाली. या बैठकीमध्येच विश्वचषकासाठीचा संघ निश्चित करण्यात आला. ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, जायबंदी असलेल्या के. एल. राहुलला संघात स्थान देण्यात आलं आहे. मात्र संजू सॅमसनला अंतिम 15 खेळाडूंमध्ये स्थान मिळालेलं नाही. पाकिस्तानविरुद्ध काही धावांनी शतक हुकलेल्या इशान किशनला या खेळीचं बक्षिस मिळालं असून त्याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. हा संघ निश्चित असून केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचं सांगितलं जात आहे.

शनिवारी रात्री झाली बैठक

निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर हे शनिवारी श्रीलंकेमध्ये गेले. त्यांनी कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविडबरोबर बैठक घेतली. शनिवारी रात्री उशीरा सामना रद्द झाल्यानंतर या तिघांची बैठक झाली. कॅण्डी येथे झालेल्या या बैठकीमध्ये भारतीय संघातील खेळाडूंची नावं निश्चित झाली आहे. 

यांनाही वगळलं

संजू सॅमसनबरोबरच तिलक वर्मा, युजवेंद्र चहल, सध्या जायबंदी असलेला प्रसिद्ध कृष्णा यांनाही अंतिम 15 खेळाडूंमध्ये स्थान मिळालेलं नाही. संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. इशान किशनला बॅकअप विकेटकिपर म्हणून संघातस्थान देण्यात आलं आहे. रोहित शर्माबरोबरच शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्या खांद्यावर भारतासाठी जास्तीत जास्त धावा करण्याची म्हणजेच फलंदाजीची जबाबदारी असेल. 

Related News

नक्की वाचा >> Asia Cup 2023 मध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना! तारीखही आली समोर

…म्हणून के. एल. राहुलचा समावेश

‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, निवड समितीने के. एल. राहुलच्या प्रकृतीसंदर्भात चर्चा केली. डॉक्टरांच्या टीमने होकार दिल्यानंतर के. एल. राहुलच्या नावाचा भारतीय संघामध्ये समावेस करण्यात आला. के. एल. राहुल नेट्समध्ये सराव करतो. बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकदामीमध्ये अनेक तास फलंदाजीचा सराव करतो. के. एल. राहुल हा आशिया चषकातील पहिल्या 2 सामन्यांमधून बाहेर पडला असला तरी पुढील सामन्यात तो खेळेल अशी दाट शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ >> Video: इशानला Out केल्यानंतरची ‘ती’ कृती हारिस रौफला महागात पडली; पंड्याने उतरवला माज

मागील 4 महिन्यांपासून के. एल. राहुल संघाबाहेर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे म्हणजेच आयसीसीकडे आपल्या अंतिम संघाची यादी सोपवण्यासाठी बीसीसीआयकडे 5 सप्टेंबरपर्यंतचा वेळ आहे. 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी निवड समितीची बैठक होणार होती. मात्र मेडिकल टीमने के. एल. राहुलला फिट घोषित केल्यानंतर बीसीसीआयने अधिक वेळ न घालवता विश्वचषकासाठीचा संघ निवडला. के. एल. राहुल विश्व चषकामध्ये भारतीय संघाचा मुख्य विकेटकीपर असेल. के. एल. राहुलच्या पायाची शस्रक्रिया झाल्याने तो मागील 4 महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानात उतरलेला नाही. 

नक्की वाचा >> Asia Cup: पाकिस्तानविरुद्ध भारताची लाज राखणाऱ्या पंड्याचं खुलं आव्हान; म्हणाला, ‘आम्ही…’

विश्वचषकासाठी निवडलेला 15 सदस्यांचा संघ – 

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, के. एल. राहुल, हार्दिक पंड्या, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी और मोहम्मद सिराजInformation Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *