नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, 6 नोव्हेंबरपासूनच होणार लागू

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते खार दरम्यान सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामामुळं रेल्वेकडून जवळपास दररोज ३०० लोकल रद्द करण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेवर आयोजित करण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळं प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशातच मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेवर प्रवाशांच्या सोयीसाठी १० एसी लोकल चालवण्यात येणार आहे. (AC Local on Central Railway)

मध्य रेल्वे येत्या सोमवारपासून म्हणजेच 6 नोव्हेंबर 2023 पासून 10 अतिरिक्त एसी लोकल धावणार आहेत. सामान्य लोकल ऐवजी एसी लोकल चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळं मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकल सेवेची संख्या दररोज 66 होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एकूण उपनगरी लोकल सेवांची संख्या 1810 राहील. 

मध्य रेल्वेवर चालवण्यात येणाऱ्या 10 एसी लोकलचे वेळापत्रकही मध्य रेल्वेने दिले आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी 1 एसी लोकल आणि संध्याकाळच्या वेळी 1 एसी लोकल चालवली जाणार आहे. तर, सोमवार ते शनिवार या कालावधीत या एसी लोकल धावतील आणि रविवार किंवा सरकारी सुट्टीच्या दिवशी एसी लोकल धावणार नसून त्या ऐवजी सामान्य लोकल धावतील. 

Related News

एसी लोकलचे वेळापत्रक

1) छत्रपती शिवाजी टर्मिनन्ससाठी स्लो लोकल कल्याणहून 7.16 वाजता सुटेल आणि 08.45 पर्यंत पोहोचेल 

2) कल्याण स्लो लोकल: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०८.४९ वाजता सुटेल आणि १०.१८ वाजता पोहोचेल

3) CSMT स्लो लोकल: कल्याणहून 10.25 वाजता सुटेल, 11.54 वाजता CSMT ला पोहोचेल.

4) अंबरनाथ स्लो लोकल: CSMT वरून 11.58 वाजता सुटेल आणि अंबरनाथला 13.44 वाजता पोहोचेल

5) सीएसएमटी स्लो लोकल: अंबरनाथहून 14.00 वाजता सुटून 15.47 वाजता सीएसएमटीला पोहोचेल

6) डोंबिवली स्लो लोकल: CSMT वरून 16.01 वाजता सुटून डोंबिवली येथे 17.20 वाजता पोहोचते.

7) परळ स्लो लोकल: डोंबिवलीहून 17.32 वाजता सुटेल आणि परळ येथे 18.38 वाजता पोहोचेल.

8) कल्याण स्लो लोकल: परळहून 18.40 वाजता सुटून, कल्याणला 19.54 वाजता पोहोचते

9) परळ स्लो लोकल: कल्याणहून 20.10 वाजता निघते, परळ येथे 21.25 वाजता पोहोचते.

10) कल्याण स्लो लोकल: परळहून 21.39 वाजता सुटून, कल्याणला 22.53 वाजता पोहोचते 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *