मुंबई, महातंत्र वृत्तसेवा : अपघातग्रस्त मच्छिमार नौका समुद्रातून बाहेर काढण्यात कोळी बांधवांना यश आले आहे. आकाश भालचंद्र कोळी (रा. मुंबई) यांची नौका बुधवारी (दि.१३) ९.४५ सुमारास मढ तलपशा बंदरातून बाहेर पडली होती. नौकेचा चालकाला सदर अंधारात मढ बेटाच्या पश्चिमेला दोन किलामीटर समुद्रात असलेल्या काश्या खडकाचा अंदाज चुकला. काळ्या अंधारात काळा खडक समजला नाही आणि नौका सदर काश्या खडकाला जाऊन धडकली. दरम्यान, या नौकेस बाहेर काढण्यात मच्छिमार बांधवांना यश आले आहे.
सदर धडकेमध्ये नौकेचा पुढील भाग क्षतीग्रस्त झाला. नौकेत मोठ्या पाणी शिरायला लागले, नौकेतील खलाशी घाबरून गेले. नौकेला वाचविण्याकरीता त्यांनी नौकेची दिशा मढ कोळीवाडा पश्चिम किना-यावर पोहचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, नौकेत मोठ्या प्रमाणात समुद्राचे पाणी शिरले. काही अंतरावर जाऊन नौका पाण्याखाली बुडायला लागली. इंजिनमध्ये पाणी गेल्याने इंजिन बंद पडले, नौकेतील सात खलाशांनी नौकेतील बोये बांधण्यास सुरुवात केली. नौकेवर सुरू असलेली रोशनाई हळू हळू काळया अंधारात लुप्त झाली, नौकेवरील खलाशी लाईफ जॅकेटचा आधार घेऊन समुद्राशी झुंज देत पोहत होते.
मच्छिमारांना सदर घटना समजली. अक्षय कोळी यांचा मदतीची हाक देणारा मॅसेज संतोष कोळी यांच्याकडे पोहचला. मढ गावातील मच्छिमार बांधवांनी त्वरीत आपल्या काही नौका काढल्या असंख्य मच्छिमार बांधव घटनास्थली पोहचले. त्यांनी पोहत असलेल्या सर्व सात खलाशांना नौकेत उचलून त्यांचा जीव वाचविला. थोड्याच वेळात संपूर्ण गांव मढ किनारी जमा झाले. तरूण वर्ग छोट्या छोटया नौका घेउन मदत कार्याला सरसावले. खुप परिश्रम करून सुद्धा रात्रीचे २ वाजेपर्यंत मच्छिमारांनी सदर नौकेला दोरखंड बांधून खेचून आणण्याचा प्रयत्न केला. परंतू, अपयशी ठरले.
रात्रभर तरूणांनी मेहनत घेऊन सर्व साहित्य जमा करून घेतले. व पहाटे घटनास्थळी पोहचले. ओहटी झाल्याने काही प्रमाणात त्यांना दोरखंड बांधता आले. व नंतर सदर नौका टोचन करून आठ मोठ्या नौकांनी खेचण्यास सुरुवात केली. लहान नौकां त्यांना सहकार्य करीत होत्या. शेकडो मच्छिमार बांधव बचाव कार्यामध्ये लागले होते. मढ किनारी मढ दर्यादिप मच्छिमार संस्थेत संतोष कोळी व धनाजी कोळी हे सर्व अधिका-यांच्या संपर्कात लागले होतो. सागरी पोलिस अधिकारी सुद्धा आले होते. मत्स्यविभागाच्या परवाना अधिकारी सुद्धा आल्या होत्या, शाशनामार्फत नौका समुद्रातून बाहेर काढण्यासाठी मदत व्हावी ह्याकरीता प्रयत्न करीत होते. स्कुबा ड्रायवर मार्फत समुद्रात पाण्याखाली जाउन नौकेला दोर बांधणे जरूरी होते. स्कुबा ड्रायवर यांना मढ येथे पोहचण्यास उशिर झाला. पुन्हा रात्र पडली. म्हणून नौका बचाव कार्य थांबविण्यात आले, पुन्हा दि 15 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजता नौका बचाव कार्य सुरू करण्यात आले व अखेर दि.17 सप्टेंबर रोजी बुडालेली बोटीला समुद्रातून इतर बोटिंच्या आणि मच्छिमार बांधवांच्या मदतीने यशस्वी पणे किनाऱ्यावर आणण्यात यश प्राप्त केले.
हेही वाचलंत का?