‘दान द्या’ म्हणत घरात घुसले, सासू सुनेला बेशुद्ध केले आणि..नागपुरात दिवसाढवळ्या धक्कादायक प्रकार

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांना घरात घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. .कारण दान द्या म्हणत एक भोंदू घरात शिरला. घरात असलेल्या सासू सुनेच्या हातात धागा बांधला. दोघी बेशुद्ध झाल्या. पुढे जो काही प्रकार घडला तो खूपच धक्कादायक होता.दुपारच्या सुमारास यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीतील धम्मदीप नगरात धक्कादायक प्रकार घडला. वर्षा बोरकर या घरात असताना तिथे भोंदूगिरी करणारे तीन तरुण आले. ‘आम्ही पालखी घेऊन चाललोय दान करा’, अशी विनवणी करायला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर वर्षा यांनी त्या दोघांनाही दहा रुपयांचं दान दिलं. घर लुटण्याच्या उद्देशाने आलेले ते दोघे भोंदू एवढ्यावरच थांबले नाहीत. 

तुमच्या घरावर संकट आहे. हे संकट टाळण्यासाठी हाताला धागा देतो. तो बांधून घ्या असं म्हणत त्याने सासू आणि सुनेला गुंगीच औषध देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर भोंदूंनी गळ्यातील सोन्याचे दागिने घेऊन ते चोरटे पसार झाले. ही घटना समजताच परिसरामध्ये खळबळ माजली आहे.

रेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे पोलिसालाच दिले आमिष, पुढे घडले असे काही..

Related News

यासंदर्भात यशोधरानगर पोलीस चौकीत भोंदूंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या भोंदूंची चौकशी सुरु केली. दरम्यान आरोपी कळमेश्वरच्या दिशेने निघाले असल्याची माहिती त्यांना मिळाली. 

चोरीच्या घटनेनंतर अवघ्या बारा तासात तिघांना अटक करण्यात यशोधरानगर पोलिसांना यश आलं. सागर याज्ञेकर, जितेंद्र याज्ञेकर, राजू गुजर, असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. तिघेही कळमेश्वर तालुक्यातील सेलूचे रहवासी आहे.

धाराशिवच्या प्रेम शिंदेची आत्महत्या की हत्या? दीड हजार वाखरवाडी ग्रामस्थांनी केली ‘ही’ मागणी

तिघेही दूध विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी त्यांची यापूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी अद्याप समोर आली नसल्याची माहिती यशोधरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी दिली.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *