घरात घुसून वृद्ध महिलेचा खून ; पिंपरी येथील धक्कादायक प्रकार | महातंत्र








पिंपरी : महातंत्र वृत्तसेवा :  छताचा पत्रा तोडून घरात घुसलेल्या चोरट्याने वृद्ध महिलेचा निर्घृण खून केला. त्यानंतर घरातील एक लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना पिंपरी येथे 31 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणात तब्बल एक आठवड्याने पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शालूबाई रुपाजी साळवे (85, रा. सॅनिटरी चाळ, पिंपरी), असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सुनीता भीमराव कांबळे (48, रा. चंद्ररंग पार्क, पिंपळे गुरव) यांनी शनिवारी (दि.5) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिल्या माहितीनुसार, शालूबाई साळवे पिंपरी येथील सॅनिटरी चाळीत एकट्या राहत होत्या. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या छताचा पत्रा तोडून आत प्रवेश केला. शालूबाई यांच्या डोक्यात कठीण वस्तूने मारून त्यांना ठार मारले. त्यानंतर त्यांच्या अंगावरील तसेच घरातल्या कपाटातील चार तोळे वजनाचे एक लाख चार हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल चोरी करून नेला. या बाबत तब्बल आठ दिवसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

 हेही वाचा :

नितीशकुमार सरकारला दिलासा… बिहारमधील जात सर्वेक्षणाला स्‍थगिती देण्‍यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी बहाल, काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

 









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *