ठाकरेंच्या कट्टर समर्थकाच्या आत्महत्येचे गूढ वाढले, कुटुंबीयांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

अमोल पेडणेकर, झी मीडिया

Shivsena Sudhir More: घाटकोपरमधील शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नेते व माजी नगरसेवक व विभागप्रमुख सुधीर मोरे (Sudhir More) यांनी गुरुवारी रात्री लोकल ट्रेनखाली आत्महत्या करत आयुष्य संपवले आहे. त्यांच्या आत्महत्येने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सुधीर मोरे यांच्या आत्महत्येनंतर चर्चांना उधाण आलं आहे. मोरे यांना ब्लॅकमेल केले जात होते, असाही आरोप करण्यात येत आहे. (Shivsena Sudhir More Suicide)

धावत्या लोकलसमोर केली आत्महत्या

सुधीर मोरे यांनी रात्री गुरुवारी रात्री 11.30 वाजताच्या दरम्यान ते घाटकोपर आणि विद्याविहारच्यामध्ये असलेल्या पुलावरुन खाली उतरले आणि कल्याणकडे जाणाऱ्या रेल्वेरूळांवर झोपले. त्याचवेळी त्यांच्या अंगावरुन भरधाव लोकल गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुधीर मोरे यांना रेल्वे ट्रॅकवर पाहून मोटरमॅनने लोकलचा वेग कमी करण्याचा प्रय़त्न केला. मात्र वेगात असलेली लोकल त्यांच्यावरुन गेली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. 

Related News

ब्लॅकमेलिंग केल्यात दावा 

दरम्यान, सुधीर मोरे यांच्या मृत्यूनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांना गेल्या काही दिवसांपासून ब्लॅकमेल करण्यात येत होते, असा आरोप करण्यात येत आहे. याच दबावातून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे सांगितलं जातं आहे. कुटुंबीयांकडून काही कॉल रेकॉर्डिंग असल्याचेही सांगण्यात असून लवकरच याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे. सुधीर मोरे यांचे रेकॉर्डिंग पोलिसांनी ताब्यात घ्यावे, असं सांगण्यात येत आहे.

कोण होते सुधीर मोरे 

सुधीर मोरे हे कट्टर ठाकरे समर्थक होते, रत्नागिरी जिल्ह्याचे विद्यमान संपर्कप्रमुख होते. यापूर्वी ते आणि त्यांची वहिनी शिवसेनेत माजी नगरसेवक होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले. आमदार राम कदम यांच्या विरोधात त्यांनी विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. मात्र, तेव्हा त्यांचा पराभव झाला होता. सुधीर मोरे यांच्या अचानक आत्महत्येने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *