मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये I.N.D.I.A. आघाडीची पुढची बैठक? संयुक्त रॅलीचीही योजना

मध्य प्रदेश: भाजप (BJP) आणि मोदी सरकारविरोधात विरोधकांनी एकत्रित येऊन इंडिया आघाडीची (I.N.D.I.A. Alliance) मूठ बांधली. पाटणा, बंगळुरु, मुंबईनंतर आता विरोधकांच्या इंडिया आघाडीची पुढील बैठक (Opposition Meeting) मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये होण्याची शक्यता आहे. भोपाळमध्ये विरोधकांच्या आघाडीची एकत्रित जनसभा देखील होऊ शकते. पीटीआय वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी सोमवारी (4 सप्टेंबर) ही माहिती दिली.

भोपाळमध्ये बैठक घेण्यावर एकमत

विरोधी आघाडी इंडियाची (I.N.D.I.A.) नुकतीच मुंबईत बैठक पार पडली. मुबंईत झालेल्या बैठकीत पुढील बैठकीच्या आयोजनावर देखील चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. पुढील बैठक भोपाळमध्ये घेण्यावर व्यापक एकमत झालं होतं, परंतु बैठकीची कोणतीही तारीख निश्चित झालेली नाही आणि पुढील बैठकीची रूपरेषाही अद्याप तयार केलेली नाही.

Related News

ऑक्टोबरमध्ये I.N.D.I.A. ची चौथी बैठक होण्याची शक्यता

पुढील वर्षी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी देशभरातील विरोधक एकवटले आहेत. NDA विरोधात एकत्रितपणे लढण्यासाठी इंडिया आघाडी योजना आखत आहे. या आघाडीची पुढील बैठक ऑक्टोबरच्या सुरुवातीला होऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं आहे. एनडीएतील नेते देखील त्यांच्या पुढील बैठकीसाठी दिल्लीचा पर्याय म्हणून विचार करत आहेत.

संयुक्त रॅली काढण्याची योजना

एनडीएला घेरण्यासाठी विरोधी पक्षनेते एकजुटीने काम करत आहेत, विरोधकांची ही एकजूट संसदेच्या अधिवेशनातही दिसून आली. I.N.D.I.A. आघाडीने यापूर्वी पाटणा, बंगळुरू आणि मुंबईत तीन बैठका घेतल्या आहेत. या आघाडीची शेवटची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत झाली होती.

मुंबईत झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी शक्य तितकं एकत्र लढण्याचा आणि जागांचा ताळमेळ बसवण्याचा संकल्प केला होता. आता निवडणुका जवळ आल्याने विरोधकांच्या इंडिया आघाडीने एनडीएच्या विरोधात विविध ठिकाणी एकत्रित रॅली काढण्याचा विचार केला आहे. जुलैमध्ये बंगळुरूत झालेल्या दुसऱ्या बैठकीत विरोधकांच्या आघाडीला ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ (I.N.D.I.A.) असं नाव देण्यात आलं होतं.

‘इंडिया’ची ताकद वाढली

या इंडिया आघाडीची ताकद आणखी वाढली आहे. यापूर्वी या आघाडीत 26 राजकीय पक्षांचा समावेश होता, आता ती संख्या 28 इतकी झाली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. महाराष्ट्रातील डाव पीडब्लूपी (PWP) आणि आणखी एक प्रादेशिक पक्ष इंडियामध्ये सामील झाला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडलं जाणार महिला आरक्षण विधेयक? उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले…

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *