पीचचा अंदाज चुकला; सुमार खेळीने श्रीलंकेचा धुव्वा: भारत ठरला आशियाईतील किंग, अवघ्या 6.1 षटकांत 10 गड्यांनी केली मात

दिव्य मराठी एक्स्पर्ट | अयाझ मेमनएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

भारत आणि श्रीलंका यांच्यात रविवारी आशिया कपसाठी झालेली फायनल ही पूर्णपणे एकतर्फी राहिली. भारताने एकहाती अंतिम सामना जिंकून आशियामध्ये आपणच किंग असल्याचे सिद्ध केले. भारताने ६.१ षटकांमध्ये अंतिम सामन्यात गत चॅम्पियन श्रीलंकेला धूळ चारली. भारताने १० गड्यांनी सामना जिंकला. यादरम्यान यजमान श्र‌ीलंका संघाला घरच्या मैदानावरील खेळपट्टीचा चुुकलेला अंदाज महागात पडला. यामुळे संघाची अंतिम सामन्यात अवघ्या ५० धावांत दाणादाण उडाली. खेळपट्टीचा अंदाज ने घेताच नाणेफेक जिंकल्यानंतर श्रीलंका टीमने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, कर्णधार शनाकाचा हाच निर्णय यजमान टीमच्या चांगलाच अंगलट आला. सिराज आणि हार्दिकच्या चेंडूचा सामना करताना श्रीलंकन फलंदाज सपशेल फ्लाॅप ठरले. यातून श्रीलंकेने सुरुवातीच्या १२ धावांसाठी चक्क ६ गडी गमावले. सिराजने १६ चेंडूंत ६ बळी घेत लंकेची धुळदाण उडवली.

Related News

भारताचे स्पर्धेतील ओव्हरऑल डावपेच यशस्वी ठरले आहेत. दुखापतीतून सावरलेल्या जसप्रीत बुमराह आणि लोकेश राहुल यांना पुनरागमन करण्याची दिलेली संधी फायदेशीर ठरली. त्यांनीही याच गुणवत्ता सिद्ध केली. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहलीनेही मोठी खेळी करत फाॅर्मात असल्याचे दाखवून दिले. बांगलादेश टीमविरुद्ध सामन्यात भारताची फलंदाजी काही प्रमाणात अपयशी ठरली होती. इशान किशनचीही फलंदाजी लक्षवेधी ठरली. यादरम्यान त्यानेही आपण फलंदाजाच्या भूमिकेतही यशस्वी होऊ शकतो, हे सिद्ध केले. विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी आशिया कप जिंकणे आवश्यक होते. या किताबाने आता टीमचा आत्मविश्वास उंचावला. कप न जिंकता माघारी परतल्यावर टीमला आपल्या कामगिरीमध्ये उणीव असल्याचे भासले असते. तसेच मोठ्या टीकेचाही सामना करावा लागला असता.

नकारात्मक: पराभवाच्या मानसिकतेतूनच श्रीलंका मैदानावर

पराभवाच्या मानसिकतेतूनच श्रीलंका संघ उतरला होता मैदानावर; सुमार खेळी महागात पडली पाकिस्तान टीमलाही फलंदाजीसाठी मैदानावर उतरल्या श्रीलंकन खेळाडूंचे हावभाव हे निराशेच्या गर्तेत सापडल्याचे संकेत देत होते. अपयशी ठरणार, हेच हावभावातून स्पष्ट दिसत होते. पाठोपाठ एक विकेट पडत होत्या, अशात श्रीलंकन फलंदाजांचीही मोठ्या खेळीची मानसिकताच नसल्याचे स्पष्ट जाणवले. याच मानसिकतेतून त्यांनी मैदानावर हजेरी लावण्याची औपचारिकता पूर्ण केल्याचे दिसून आले. विश्वचषकाच्या तोंडावर सुमार खेळी श्रीलंकेला अडचणीची.

टर्निंग पॉइंट : अंदाज न बांधल्याने बसला फटका; सुरुवात बळीने

श्रीलंका टीमला ऐन फायनलमध्ये आपल्या मैदानावरील खेळपट्टीचा अचूक असा अंदाज बांधता आला नाही. घरचे मैदान म्हणून यजमान श्रीलंका टीमने या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. मात्र, याच अंदाजाकडे फिरवलेली पाठ, यजमान टीमला महागात पडली. यामुळे श्रीलंकन फलंदाजांना फार काळ गोलंदाजांसमोर आपले आव्हान कायम ठेवता आले नाही. गोलंदाजांच्या स्विंग चेंडूंचा सामना करताना हे फलंदाज अपयशी ठरले. त्यांना आपली फलंदाजीची शैली आत्मसात करण्यास वेळच मिळाला नाही. टेक्निक अॅडजस्ट होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाल्यावर गेम प्लॅनमध्ये बदल करावा लागतो. मात्र, ही साधी गोष्ट ही श्रीलंका टीमने केली नाही. यातून श्रीलंका संघाने झटपट आपल्या विकेट गमावल्या.

ग्राउंड स्टाफला ४२ लाखांचे बक्षीस

पावसातही श्रीलंकेतील आशिया कपचे सामने यशस्वीपणे खेळवल्या गेले. या मागे ग्राऊंड स्टाफची भुमिका महत्वपूर्ण ठरली. यामुळे त्यांना आशियाई क्रिकेट काैन्सिलने (एसीसी) ४२ लाखांचे बक्षिस जाहीर केले.

असेही विक्रम

  • सिराज हा श्रीलंकेविरुद्ध सहा बळी घेणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी आशिष नेहराची २००६ मध्ये ही कामगिरी.
  • वाॅशिंग्टन सुंदरने यंदाच्या सत्रात श्रीलंकेविरुद्ध दुसरा सामना खेळला आहे. त्याचे जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध विजयातही मोलाचे योगदान.​​​​​​​
  • रोहित आणि जडेजाने चाैथ्यांदा आशिया कप जिंकला आहे. या दोघांच्या नावे विक्रमी जेतेपदाची नोंद झाली आहे.
  • रोहित शर्माने आशिया कपची सर्वाधिक पाचवी फायनल खेळली आहे. याचा रोहितच्या नावे विक्रम नोंद.
  • भारतीय संघाने पहिल्यांदा एकाच मालिकेत दोन सामने १० गड्यांनी जिंकले आहेत.नेपाळवरही १० विकेटने मात केली होती.
  • सकारात्मक बाजू: रोहितच्या नेतृत्वात डावपेच यशस्वी; विश्वचषकापूर्वी उंचावला आत्मविश्वास

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *