दुष्काळ घोषित करण्यासह 24 तास वीजेची केली होती मागणी: अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन तूर्त स्थगित

  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • After The Assurance Of The Authorities, The Thiya Agitation Of The Farmers’ Organization Demanded 24 hour Electricity Along With The Declaration Of Suspended Drought For The Time Being

अमरावती9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

कृषी पंपाला चोवीस तास वीज तसेच तालुका दुष्काळग्रस्त घोषित केला जावा या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेले ठिय्या आंदोलन आज, मंगळवारी मागे घेण्यात आले. तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आज, मंगळवारी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी योग्य समझोता केला. शिवाय मागण्या मान्य करण्याबाबत लेखी पत्र दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

शेतकरी संघटनेच्या हाकेनुसार सुरु झालेले हे आंदोलन आंदोलन विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एम. शृंगारे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. डब्ल्यू. पुरी सतिश नंदवंशी आदींनी महावितरणच्या मुंबई येथील मुख्य अभियंत्यांसोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा घडवून आणली.

दरम्यान वरिष्ठ पातळीवरुन लवकरच कार्यवाही केली जाणार असल्याचे चर्चेदरम्यान सांगण्यात आले. अंजनगाव तालुक्यातील सर्व डीपी दुरुस्त करुन, रात्रीचा वीजपुरवठा सुरू असताना लाईनमन कार्यस्थळी हजर ठेवला जाईल. शिवाय अचानक उद्भवलेल्या समस्यासुद्धा सोडविल्या जातील, असे लेखी पत्र सहायक अभियंता लिहून दिले आहे. या चर्चेनंतर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी माधवराव गावंडे, संजय हाडोळे, गजानन पाटील दुधाट सुनील पाटील साबळे, यांनी तूर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली.

या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या या ठिय्या आंदोलनाला सर्वच राजकीय पक्षांनी, विविध स्वयंसेवी संघटनांनी सक्रीय पाठिंबा जाहीर केला होता.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *