मराठा आंदाेलनाची धग तिसऱ्या दिवशीही कायम: फुलंब्रीत राज्य शासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा‎; कडकडीत बंद पाळला

फुलंब्री44 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

खुलताबाद तालुक्यातील सकल मराठा समाजासह सर्व पक्षांच्या वतीने खुलताबाद येथील चौकात जाहीर निषेध करण्यात आला.

प्रतिनिधी | फुलंब्री

Related News

फुलंब्री येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्य रस्त्यावर वाजत गाजत राज्य सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून महात्मा फुले चौकात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गृहमंत्र्यांचा निषेध करत घटनेच्या तिसऱ्या दिवशीही कडकडीत बंद पाळण्यात आला.

सोमवारी तालुक्यात बंद पाळून मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांना हजारोंच्या उपस्थितीत गृहमंत्री यांची वाजत गाजत प्रतीकात्मक अंत्ययात्रा फुलंब्री बसस्थानक येथे काढून अखेर महात्मा फुले चौकात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी मडके, तिरडी, पानोड्या, त्याचप्रमाणे मृतदेहाला वारा घालण्याचीही कसर सोडली नाही. त्याचप्रमाणे शेकडो टरबूज घेऊन रस्त्यावर टरबूज फोडून निषेध व्यक्त केला. तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांना निवेदन देण्यात आले. सहाशेच्यावर मराठा समाज बांधव उपस्थित होते.

तहसील कार्यालयात आणले बैल

शेलगाव (गणपती) येथील शुभम जगताप या शेतकऱ्याने शेलगाव ते तहसील कार्यालय हे दहा किलोमीटर अंतर पायी चालत बैलाला सोबत घेऊन तहसील कार्यालय गाठले व तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांना निवेदन दिले. निवेदनात आरक्षण त्वरित देण्यात यावे, आरक्षण लागू होत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याचे निवेदनातून मांडून सरकारचा निषेध व्यक्त केेला.

आंदोलन, बस बंदमुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर शुकशुकाट

मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्य छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंद होता. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर सकाळ पासून शुकशुकाट होता. वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा या प्रमुख पर्यटन स्थळांवर तुरळक पर्यटकांनी भेट दिल्या. बीबी का मकबऱ्याला रोज जवळपास ४ हजार पर्यटक भेटी देतात. त्यामुळे मकबरा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. परंतु, सोमवारी केवळ दिवसभरात ८०० पर्यटकांनी भेट दिली. यामुळे परिसरात शुकशुकाट होता.

सिल्लोड शहरात युवकाने‎दुचाकी जाळून केला‎शासनाचा निषेध‎

मराठा समाजाला आरक्षण द्यावे म्हणून राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सिल्लोड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. गोळेगाव येथील मराठा मोर्चा समन्वय समितीचे कार्यकर्ते अनिल बनकर यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आपल्या स्वतःच्या मालकीची दुचाकी पेटवून दिली व महाराष्ट्र सरकारचा निषेध करीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणा दिल्या. सोमवारी सकाळी ११ वाजता शहरात मराठा मोर्चा समन्वय समितीचे सर्व मराठा बांधव व सत्ताधारी विरोधी पक्षात असलेले मराठा समाजाचे नेते या बंदसाठी सहभागी झालेले दिसून आले होते.

खुलताबाद तालुक्यामध्ये कडकडीत बंद

खुलताबाद | तालुक्यातील सकल मराठा समाजासह सर्व पक्षांच्या वतीने खुलताबाद येथील चौकात जाहीर निषेध करण्यात आला. विशेष म्हणजे या कडकडीत बंदला मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दर्शवला होता. तालुक्यातील सुलतानपूर, गदाना, बाजारसावंगी, बोडखा, गोळेगाव, घोडेगाव, वेरूळ, कसाबखेडा, गल्लेबोरगाव अशी तालुक्यातील सर्व गावे व बाजारपेठ बंद होत्या. शहरातील चौकातील म्हैसमाळ रस्त्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने आंतरवाली सराटी येथील घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. यादरम्यान शहरातील मुस्लिम मान्यवरांनीही भाग घेतला होता. सकल मराठा समाजाच्या वतीने एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नायब तहसीलदार एन. एम. लुणावत यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

कासोद येथे रस्त्यावर दूध सांडून केला राज्य सरकारचा निषेध

सिल्लोड | जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातील कासोद येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रस्त्यावर दूध सांडून शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. भराडी-घाटनांद्रा रस्त्यावर सकल मराठा समाजाने रस्त्यावर दूध सांडून घटनेचा निषेध केला. दोषींवर कारवाई करावी तसेच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासह जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. या वेळी सकल मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कन्नड शहरात जनआक्रोश मोर्चा

कन्नड| शहरात सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळत मराठा समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. मराठा आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश देणाऱ्या गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, दोषी पोलिस अधिकाऱ्यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करुन शासन स्तरावर कारवाई करून मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, अशा मागणीचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी शिवकन्याच्या हस्ते उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडवकर, उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. मोर्चात सहभागी झालेल्या हजारो सकल मराठा बांधवांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहायक पोलिस निरीक्षक तात्याराव भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात होता.

मुर्शिदाबादवाडीचे ग्रामस्थ टाकणार मतदानावर बहिष्कार, आंदोलनही तीव्र करणार

मुर्शिदाबादवाडी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन मराठा आरक्षण लागू केल्याशिवाय कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान करणार नसल्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे पंधरा दिवसांच्या आत आरक्षण लागू न केल्यास गावातील मारुती मंदिर परिसरात आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. दरम्यान, गावातील नागरिकांनी सोमवारी गावात कडक बंद पाळून राज्य सरकारचा निषेध केला. आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही ग्रामस्थांनी केला.

फुलंब्री येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्य‎रस्त्यावर वाजत गाजत राज्य सरकारची प्रतीकात्मक ‎अंत्ययात्रा काढून महात्मा फुले चौकात अंत्यसंस्कार‎ करण्यात आले.

फुलंब्री येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्य‎रस्त्यावर वाजत गाजत राज्य सरकारची प्रतीकात्मक ‎अंत्ययात्रा काढून महात्मा फुले चौकात अंत्यसंस्कार‎ करण्यात आले.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *