सीसीटीव्ही फुटेजमधून उलघडली चोरी: जनसंवाद रॅलीत भाजप नेत्यांच्या खिशातून पैसे उडविणारे आकोटचे खिसेकापू पोलिसांच्या ताब्यात

अमरावती | परतवाडा10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत परतवाडा शहरात पार पडलेल्या जनसंवाद यात्रदरम्यान पैसे उडविणाऱ्या खिसेकापूंचा शोध लागला असून त्यांना अकोट येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

जनसंवाद रॅलीत तब्बल 10 पदाधिकाऱ्यांना झटका देत खिसेकापूंनी लाखो रूपये लंपास केले होते. ही बाब रॅलीच्या समारोपानंतर लक्षात आल्याने एक पदाधिकारी दिनेश बछले यांनी तक्रार दाखल केली होती. दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी 379 अन्वये गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. तपासादरम्यान त्यांनी अकोट येथील एक आरोपी ताब्यात घेतला आहे.

भाजपची जनसंवाद रॅली दुराणी चौक, सदर बाजार या दरम्यान सुरु असताना या खिसेकापूंनी अंजनगाव सुर्जीचे माजी नगराध्यक्ष ॲड कमलकांत लाडोळे, समीर हावरे, दिनेश बछले, गोपाल चंदन, नितीन गुडधे, कविटकर, आदिंचे खिसे कापत नगदी रक्कम लंपास केली होती.

खिसेकापूंनी सांगितले रक्कम उडविली

पोलिसांनी तपासाचे चक्र गतीमान करत या घटनेतील आरोपी आकोट येथील फईम खान अहमद खान (25) यास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे माध्यमातून फुटेज तपासत माहिती गोळा केली असून ताब्यात असलेल्या फईमने इतर सोबती असल्याची माहिती दिली आहे. घटनेच्या दिवशी भाजपाच्या जनसंवाद रॅलीत विविध घोषणा करत असताना या नेत्यांनी हात वर करताच काही क्षणात खिसेकापूंनी रक्कम उडविल्याची माहिती पुढे आली आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *