ऑस्ट्रेलियाचा पहिलाच निर्णय भारताच्या पथ्यावर! World Cup आपणच जिंकणार हे निश्चित?

World Cup 2023 Final India vs Australia Toss: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या वर्ल्ड कप 2023 च्या फायलनचा टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला. मात्र टॉस जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी घेण्याऐवजी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने आश्चचर्य व्यक्त केलं जात आहे. अनेक आजी-माजी क्रिकेपटूंनी टॉस जिंकल्यास प्रथम फलंदाजी करण्याचा सल्ला दिलेला असतानाही दवबिंदूंचा विचार करुन ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी निवडली. मात्र हा पहिलाच निर्णय भारताच्या पथ्यावर पडण्याची दाट शक्यात आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवरील वर्ल्ड कप 2023 मधील आकडेवारी पहिल्यास पहिली फलंदाजी करणाऱ्या संघाच्या विजयाची शक्यता अधिक असते.

या स्टेडियमवरील आकडेवारी काय सांगते?

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्ड कपचे एकूण 4 सामने झाले आहेत. यापैकी 3 सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. यामध्ये भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभूत केलेल्या सामन्याचाही समावेश आहे. या मैदानामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करुन सामना जिंकणारा एकमेव संघ हा ऑस्ट्रेलियाचाच आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला या मैदानामध्ये पराभूत केलं आहे. 287 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 253 वर बाद झाला. मात्र इंग्लंडचा संघ यंदाच्या पर्वातील सर्वात दुबळा संघ असल्याने हा विजय तसा निसटचाच ठरला. 

रोहित म्हणालेला टॉस महत्त्वाचा नाही

मात्र वर्ल्ड कपचे या मैदानातील महत्त्वाचे सामने जवळपास महिन्याभरापूर्वी झाले होते. आता भारतामधील तापमान हिवाळ्यात कमी झालं असून तापामनाचा परिणाम होणार असं भारतीय कर्णधार रोहित शर्माही पत्रकारांशी संवाद साधताना शनिवारीच म्हटलं होतं. “तापमान नक्कीच आधीपेक्षा कमी झालं आहे. दवाचा किती परिणाम होईल मला ठाऊक नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी आम्ही दवं असेल असा विचार करुन सराव केला होता. मात्र फारसं दवं मैदानामध्ये नव्हतं,” असं रोहितने सांगितलं. “वानखेडेवरही असाच सराव केला. पण तिथेही दवं नव्हतं. त्यामुळेच मला वाटतंय की टॉस हा महत्त्वाचा घटक या (अंतिम) सामन्यात नसेल,” असंही रोहित म्हणाला होता.

Related News

अनेकांनी झाली त्या भविष्यवाणीची आठवण

प्रसिद्ध भविष्यकार सुमित बजाज यांनी शनिवारीच ऑस्ट्रेलियन संघ एक महत्त्वाची चूक सामन्यात करेल असं म्हटलं होतं. “भारत 19 नोव्हेंबर 2023 रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणारा 2023 चा वर्ल्ड कप जिंकेल. हा भारतासाठी वर्ल्ड कपमधील सर्वात कठीण सामना ठरेल. तसेच पॅट कमिन्सला त्याने घेतलेल्या एका निर्णयाचा खेद होईल,” असं ट्वीट सुमित यांनी केलेलं. याच ट्वीटची आठवण अनेकांना झाली आहे.

आधीच्या वर्ल्ड कपची आकडेवारी काय सांगते?

पहिल्या 5 वर्ल्ड कपमध्ये टॉस जिंकणाऱ्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करुन मोठा स्कोअर केला आणि वर्ल्ड कप जिंकला. मागील 3 एकदिवसीय वर्ल्ड कप हे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. टी-20 वर्ल्ड कपची आकडेवारी पाहिली तरी मागील 4 वर्ल्ड कप धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकला आहे. त्यामुळे आता प्रथम फलंदाजी करुन भारत 2023 चा वर्ल्ड कप जिंकतो का हे येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *