एशियन गेम्स शनिवारपासून: युवांवर आता पदकाची मदार; सुमार खेळी व अंतर्गत वादामुळे दिग्गज खेळाडू अडचणीमध्ये!

  • Marathi News
  • Sports
  • Asian Games 2023 Medals Now On The Youth; Veteran Players In Trouble Due To Smooth Playing And Internal Disputes!

नवी दिल्ली | इशिता अग्रवाल38 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

चीनमध्ये येत्या शनिवारपासून एशियन गेम्सला सुरुवात हाेणार आहे. यासाठी भारताचे ६५५ सदस्यीय खेळाडूंचे जम्बाे पथक सहभागी हाेणार आहे. भारताचे हे आतापर्यंतच्या आशियाई स्पर्धेच्या इतिहासातील हे सर्वात माेठे पथक मानले जात आहे. यामुळे आता भारताचे खेळाडू ३९ खेळ प्रकारांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत पदकाचा बहुमान मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत. युवा खेळाडूंवर पदकाची मदार असणार आहे. कारण, दिग्गज खेळाडूंना सध्या सुमार खेळी आणि अंतर्गत वादाचा माेठा फटका बसला आहे.

Related News

वादग्रस्त कुस्तीमुळे पदकाची आशा धूसर; निराशेच्या गर्तेतील पी. सिंधूची वाट खडतर
भारतीय संघाला कुस्तीमध्ये पदकाचे प्रबळ दावेदार मानले जाते. मात्र, गत वर्षभरापासून या खेळामध्ये सातत्याने वादाचा सामना रंगत आहे. यामुळे यातील पदकाच्या आशाही धूसर झाल्या आहेत. भारताच्या नावे आशियाई स्पर्धेत कुस्ती खेळ प्रकारात ५९ पदकांची नाेंद आहे. मात्र, या वेळी कुस्तीत दिग्गजांकडून पदकाची फारशी आशा नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्ती संघाचे नेतृत्व करणारा बजरंग पुनिया वादामुळे फॉर्म गमावून बसला आहे. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय संघाला एकही पदक मिळालेले नाही.

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि तैवानची ताई त्झू यिंग यांच्यातील सामना नेहमीच लक्षवेधी ठरताे. मात्र, सिंधूला सुमार खेळीमुळे सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. तिला २०१९ पासून यिंगविरुद्ध सामन्यात सलग आठ वेळा पराभवाला सामाेरे जावे लागले आहे. दुसरीकडे स्क्वॉशमध्ये सौरव घोषाल आणि मलेशियाच्या इयान यो एनजी यांना कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाते. यंदा पॅरिस स्क्वॉश स्पर्धेत सौरवने इयानवर मात केली हाेती. तसेच २०१८ मध्ये मलेशियाने सांघिक सामन्यात भारताचा पराभव करून कांस्यपदक मिळवले होते.

मणिका बत्रा, राहीकडून आशा; अॅथलेटिक्स खेळात साेनेरी पल्ला गाठण्याचा दावा अधिक
बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत एचएस प्रणय आणि लक्ष्य सेन हेच ​​पदकाचे दावेदार मानले जात आहेत. त्याच वेळी शॉटपुट खेळाडू सीमा पुनिया, टेबल टेनिसपटू मणिका बत्रा आणि नेमबाजीतील राही सरनोबत यांच्याकडून पदकाची आशा आहे. दुसरीकडे, अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा, बॉक्सर निखत झरीन, लवलिना बोरगोहेन, वेटलिफ्टर मीराबाई चानू, टेबल टेनिसपटू शरथ कमल फाॅर्मात आहे. यामुळे त्यांनाही पदकाचे प्रबळ दावेदार मानले जाते. यातून संघाच्या नावे पदकाची नाेंद हाेईल.

कबड्डीमधील भारत आणि इराणमधील युद्ध आठ वर्षे जुने आहे. नुकत्याच झालेल्या कामगिरीनुसार भारताने यंदाच्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये इराणचा ४२-३२ असा पराभव केला. पण गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताला पराभव पत्करावा लागला होता. इराणने सुवर्णपदक तर भारताने कांस्यपदक जिंकले. हॉकीमधील ही स्पर्धा भारत आणि पाकिस्तान यांच्यात होते. वर्ल्ड कप व आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा वरचष्मा आहे. भारताने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानचा पेनल्टीवर पराभव केला.

पॅरिस ऑलिम्पिक तिकिटाचे दावेदार
या वेळी खेळाडू आशियाई स्पर्धेत पदकांसह पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारताचे आतापर्यंत २०२४ च्या ऑलिम्पिकसाठी १५ खेळाडू पात्र ठरले आहेत.

सेलिंग | गेल्या वेळी भारताने सेलिंगमध्ये एक रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकले होते. या वेळी नौकानयनात विविध श्रेणींमध्ये एक ते तीन कोटा आहेत.

हॉकी | फाॅर्मात असलेला भारतीय पुरुष संघ ऑलिम्पिक तिकीट मिळवू शकताे. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना थेट ऑलिम्पिक प्रवेश निश्चित करता येईल.

तिरंदाजी | स्पर्धेतून रिकर्व्ह तिरंदाजीसाठी कोटा मिळू शकतो. मिश्र संघांसाठीही संधी आहे. महिला व पुरुष एकेरीत सुवर्ण व रौप्य विजेत्यांचा प्रवेश निश्चित हाेईल

बॉक्सिंग | भारताला कोटाची संधी आहे. पुरुषांसाठी प्रत्येक वजन गटात २, तर महिलांमध्ये ६ वजन गटात ४ जणांना ऑलिम्पिक तिकिटाची संधी आहे.

नव्या खेळामध्ये भारताला ५ जणांकडून पदकाची आशा
किशोर कुमार जेना ( भालाफेक): 28 वर्षे

बुडापेस्ट येथे जेनाने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ८४.७७ मीटरची सर्वोत्तम कामगिरीतून पदक जिंकले हाेत. तसेच चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले.

भवानी देवी ( तलवारबाजी): 30 वर्षे
आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पहिले तलवारबाजीचे पदक मिळवून देणारी भवानीदेवी या वेळी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तिने दोन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

आर्यन नेहरा (जलतरण): 19 वर्षे
भारताच्या १९ वर्षीय आर्यनने नुकताच ८०० मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम केला आहे. यंदाच्या जागतिक स्पर्धेत तो तिसरा सर्वोत्तम आशियाई ठरला होता.

ईशा सिंग (नेमबाजी ): 18 वर्षे
पदार्पण करणाऱ्या ईशा सिंगने महिनाभरापूर्वी झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. ती आता दावेदार आहे.

प्रणिती नायक ( जिम्नॅस्टिक्स): 28 वर्षे
आठवडाभरापूर्वी वर्ल्ड चॅलेंज कपच्या कांस्यपदक विजेत्या प्रणितीने गत आशियाई चॅम्पियनशिपमध्येही कांस्यपदक जिंकले होते.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *