नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात श्रींची प्रतिष्ठापना: गणरायाच्या कृपेने प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होवो- जगतात

नगर4 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

सर्वांचे लाडके दैवत गणपती बाप्पांचे आगमन झाले. विशाल गणपती हे नगरचे ग्रामदैवत आहे. प्रत्येक नगरकराचे श्रध्दास्थान आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणूनही विशाल गणपतीची राज्यभरात ख्याती आहे. येथील पारंपरिक गणेशोत्सव सर्व गणेशभक्तांचे आकर्षण असतो. गणरायाच्या कृपेने प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होवो, अशा शुभेच्छा आमदार संग्राम जगताप यांनी गणेशोत्सवानिमित्त नगरकरांना दिल्या.

Related News

मंगळवारी सकाळी शहराचे ग्रामदैवत माळीवाड्यातील श्री विशाल गणपती मंदिरात श्रींच्या प्रतिष्ठापना पूजेस उपस्थिती लावून आमदार जगताप यांनी दर्शन घेतले. आमदार जगताप म्हणाले,

गणपती हे बुध्दीचे दैवत आहे. विघ्नहर्ता, सुखकर्ता प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. गणेशोत्सव ही आपल्याला मिळालेली मोठी परंपरा आहे. धार्मिक सण उत्सवांतूनच आपण एकत्र येतो, एकमेकांशी संवाद, सौहार्द वाढतो. असा अतिशय मोठा सांस्कृतिक, धार्मिक वारसा आपल्याला लाभला आहे हे आपल्या प्रत्येकाचेच भाग्य आहे. सर्व नगरकर अतिशय उत्साहात, जल्लोषात गणेशोत्सव साजरा करीत असून पुढील दहा दिवस सर्वत्र उत्साहात उत्सव साजरा होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही उत्सवाची मोठी तयारी केली असून आबालवृध्दांना भावतील असे देखावे गणेशभक्तांना पहायला मिळणार आहेत. एकूणच सर्वत्र मांगल्य घेऊन आलेल्या गणेशोत्सवाचा आनंद प्रत्येकाने मनमुराद घ्यावा.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *