‘मर जा लेकीन छोडना मत’ शब्द कानावर पडले अन्… राजेश रमेश जीवाच्या आकांताने धावला; पाहा Video

Rajesh Ramesh, 4 X 400m Relay : फरहान अख्तरचा भाग मिलखा भाग सिनेमाचा शेवटचा सीन लक्षात आहे का? मिल्खा सिंग ज्यावेळी पाकिस्तानमध्ये रेससाठी मैदानात उतरतो, त्यावेळी पाकिस्तानचा कोच म्हणतो ‘ये तुम्हारी आखरी रेस हो सकती है’, त्यावर मिल्खा सिंग उत्तर देतो, ‘दोडुगां भी वैसेही’… या क्षणाची प्रचिती देणारा एक किस्सा नुकत्याच झालेल्या हंगेरी येथील जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत घडला. 4 बाय 400 मीटर रिलेच्या भारतीय संघात राजेश रमेश, महंमद अजमल, अमोज जेकब आणि महंमद अनस यांनी मोठा पराक्रम गाजवल्याचं दिसून आलं. 

आशियाई विक्रम मोडून पहिल्यांदा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने प्रवेश केला होता. भारताचा संघ 4×400 मीटर रिले पुरुष संघ पाचव्या स्थानावर राहिला. मोहम्मद अनस याहिया, अमोज जेकर, मोहम्मद अजमल वारियाथोडी आणि राजेश रमेश या चौघांनी अंतिम फेरीत 2.59.92 सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली. तीन सेकंदाच्या फरकाने टीम इंडियाचं पदक हुकलं. मात्र, पहिल्यांदाच फायनलमधील प्रदर्शनावरून मोठा विक्रमी कामगिरी केल्याचं समोर आलं.

4×400 मीटर रिले स्पर्धेच्या क्वालिफाय सामन्यात प्रवेश करताना राजेश रमेश जिवाच्या आकांताने पळाला होता. झालं असं की, चारशे मीटरचा राष्ट्रीय विक्रमवीर महम्मद अनसने दमदार सुरूवात करून दिली. शेवटच्या राऊंडवेळी राजेश रमेश याच्यावर संपूर्ण लक्ष लागलं होतं.  राजेश रमेशच्या हाती बॅटन आली अन् त्याने धाव घेतली.  त्यावेळी ‘मर जा लेकीन छोडना मत’ असा आवाज त्याच्या कानी पडला अन् राजेश रमेश जीव तोडून पळाला. अमेरिकेच्या जस्टीन रॉबीन्सनला मागे सोडलं. दोन्ही स्पर्धकांमध्ये जोरदार स्पर्धा झाली. त्यावेळी राजेश रमेशने बाजी मारली. अखेरीस रेस त्याने पार केली अन् तो रमेश ट्रॅकवर कोसळला. त्यानंतर त्याला व्हील चेअरवरून नेण्यात आलं. त्याच्या या कामगिरीनंतर अनेकांनी त्याचं कौतूक केलंय. 

Related News

पाहा Video

दरम्यान, 4×400 मीटर रिले स्पर्धेत अखेरीस अमेरिकने बाजी मारली. अमेरिकेच्या संघाला सुवर्णपदक मिळालं. त्यांनी 2 मिनिट 57.31 सेकंदात रेस फिनिश केली. तर फान्सच्या संघाने रौप्यपदकाला गवासणी घातली. फान्सच्या धावपटूंनी 2 मिनिट 58.71 सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. तर ग्रेट ब्रिटनच्या संघाला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. जमैकाचा क्रमांक 4 वर आला तर भारतीय खेळाडूंनी 5 व्या क्रमांकावर झेप घेतली.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *