आश्रमशाळेत आढळला तरुणाचा मृतदेह, आकस्मात मृत्यूची नोंद, पण वडिलांना वेगळाच संशय

ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया,

Dharashiv Crime News: धाराशिव तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली आहे.   तालुक्यातील वानेवाडी येथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यू झाल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मुलाच्या वडिलांनी एक गंभीर आरोप केला आहे. 

धाराशिव तालुक्यातील नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, मुलाच्या वडिलांनी याबाबत संशय व्यक्त करत वेगळाच दावा केला आहे.

परिसरात एकच खळबळ

मुलाचा मृत्यू हा नैसर्गिक नसून मारहाण करून मुलाला लटकवण्यात आल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेम शिंदे असं मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

दोरखंडाला लटकवलेल्या अवस्थेत मृतदेह

धाराशिव तालुक्यातील वानेवाडीमध्ये वारकरी संप्रदायाची शिक्षण देणारी नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेमध्ये प्रेम शिंदे दहावीत शकत होता. शनिवारी त्याचा मृत्यू झाला. प्रेम शिंदे याचा मृतदेह दोरखंडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यामुळं ही आत्महत्या असल्याचा संशय प्रथमदर्शनी वर्तवण्यात आला होता. मात्र, आपल्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याला मारहाण करून लटकवण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळं अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

संस्थाचालक पोलिसांच्या ताब्यात 

दरम्यान, याप्रकरणी आश्रमशाळेचे संस्थाचालक उंबरे महाराज यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर ही आत्महत्या आहे की हत्या हे स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर,  पोलीस या प्रकरणाचा सध्या कसून तपास करत आहे. लवकरच प्रकरणाचा उलगडा होणार आहे. Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *