अहमदनगर27 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील श्री वृद्धेश्वर देवस्थान मंदिरामध्ये चोरी झाली आहे. मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास मंदिराच्या पाठीमागील बाजूने येत चोरट्यांनी ही चोरी केली. मंदिराचा दरवाजा कडीकोंडा साखळी तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला व मंदिरातील चार दानपेट्या उचलून नेल्या.
मंदिराच्या मागे दानपेट्या नेत फोडल्या
मंदिराच्या पाठीमागील नदीजवळ नेऊन त्या दानपेटयांची कटर सारख्या हत्याराने तोडफोड करून त्यातील लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. चोरीची ही संपूर्ण घटना मंदिराच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरट्यांनी आपले चेहरे पूर्णपणे झाकले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे. हा संपूर्ण प्रकार दुसऱ्या दिवशी बूधवारी पहाटे मंदिराचे पुजारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला.
शिवलिंगाजवळची दानपेटी उचलता आली नाही
श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे मंगळवारी रात्री नऊची आरती आटोपल्यानंतर देवस्थान समितीने मंदिर बंद करून घेतले. त्यानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास मंदिराच्या पाठीमागून चार-पाच अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील चार दानपेट्या उचलून पाठीमागील बाजूस नेल्या. मात्र मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात ज्याठिकाणी आदिनाथांचे स्वयंभू शिवलिंगआहे, त्या शिवलिंग जवळची दानपेटी मात्र चोरट्यांना उचलता आली नाही. त्याठिकाणी मात्र चोरट्यांनी सपशेल माघार घेत तिथून काढता पाय घेतला.
चोरांना लवकर अटक करण्याची मागणी
मंदिराच्यापाठीमागे नदीच्या जवळ नेलेल्या चार दानपेट्यातील लाखो रुपयांचा नोटासह सोनेचांदीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. दानपेटीतील भाविक भक्तांनी टाकलेले काही सोनेचांदीच्या वस्तू चोरट्याने लंपास केल्या. पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक सौरभ राजगुरू, कौशल्य निरंजन वाघत सेच श्वानपथक तसेच ठसे तज्ञ व श्वानपथकही घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांना लवकर अटक करावी, अशा सूचना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिलेयांनी पोलिस प्रशासनाला दिल्या.याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला.