मुंबई36 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
उद्या मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. यासाठी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मुंबईत डेरा टाकण्यास सुरुवात केली आहे. अवघ्या देशाच्या नजरा या बैठकीकडे लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांची बुधवारी एक संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यात या नेत्यांनी विरोधकांच्या बैठकीची रुपरेषा सादर करत केंद्राच्या स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करण्याच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला.
या शिवाय राहुल गांधी, अखिलेश यादव, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह अनेक मोठे नेते मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. एकूण 28 पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
आंबेडकरांची आघाडीत येण्याची इच्छा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आंबेडकरांच्या वंचितसोबत आमची युती आहे. इंडियात येण्याची प्रकाश आंबेडकरांची इच्छा आहे का हे विचारावे लागेल. उद्धव ठाकरे यांनी यावेळी आमची प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीशी युती असल्याचेही स्पष्ट केले. आमची प्रकाश आंबडेकरांच्या वंचितशी युती आहे. त्यांना इंडिया आघाडीत त्यांना घेण्याच्या मुद्यावर चर्चा जाईल. पण त्यांची या आघाडीत येण्याची इच्छा आहे का, ते विचारावे लागेल. केंद्राच्या गॅसच्या दरात 200 रुपयांची कपात करण्याच्या निर्णयावरही उद्धव ठाकरे यांनी यावेळी निशाणा साधला. विरोधकांच्या वाढत्या ताकदीमुळे केंद्र सरकार गॅसवर गेले आहे. इंडिया आघाडीची ताकद वाढेल, तेव्हा हे सरकार गॅसही मोफत देईल, असे ते म्हणाले.
जनतेला देशात परिवर्तन हवे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावेळी जनतेला देशात परिवर्तन हवे असल्याचे स्पष्ट केले. जनतेला देशात परिवर्तन हवे आहे. अनेक राज्यांतून आम्हाला म्हणजे इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. इंडियाच्या मुंबईतील बैठकीला 28 पक्ष व त्यांचे प्रतिनिधी हजर राहणार आहेत. मायावतीचा भाजपशी ही सुसंवाद सुरू आहे, लोकांना देशात परिवर्तन हवे आहे, अनेक राज्यातून आम्हाला प्रतिसाद मिळत आहे, असे पवारांनी म्हटले आहे.
फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणार
माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, जसे आपण आपल्या बहिनीचे रक्षण करतो तसेच देशाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. आम्ही सर्व पक्षाचे लोक या बैठकीसाठी तयारी करत आहोत. इंडिया आघाडीत आता 28 राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा टीकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, आम्ही ही विचारधारा पुढे घेऊन जाणार आहोत. असे मतही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अरुणाचल प्रदेशमध्ये चीन घुसलाय जसे इंडिया पुढे जाईल तसे चीन मागे हटेल. आम्ही आलेल्या सर्व नेत्यांचे महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करणार आहोत, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.