‘या’ भारतीय खेळाडूने काश्मीरमध्ये जाऊन गुपचूप उरकलं लग्न, Video मुळे उघडलं रहस्य

Sarfaraz Khan Marriage Video : अनेक सेलिब्रिटी आपल्या आयुष्यातील काही क्षण अगदी खाजगी ठेवतात. त्यातील एक क्षण असतो तो म्हणजे लग्न. अनेक वेळा सेलिब्रिटी हे गुपचूप लग्न करतात मात्र नंतर त्या लग्नाचे फोटो किंवा व्हिडीओ समोर येतात आणि त्यांचं हे गुपित जगासमोर येतं. असाच एका भारतीय क्रिकेटपटू यांने कोणाला न कळू देता काश्मीरमध्ये जाऊन लग्न केलं. मात्र लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याचं हे गुपित जगासमोर आलं. 

या खेळाडूनने काश्मीरमधील शोपियानमध्ये जाऊन विवाह केला आहे. हा खेळाडू दुसऱ्या तिसरा कोणी नाही तर सफराज खान आहे. मुंबईचा युवा क्रिकेटर सरफराज खानने गुपचूप लग्न केलं आहे. त्याचा लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (Mumbai Cricketer Sarfaraz Khan Marriage in kashmir video viral today  Google news trending)

काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील तरुणीशी त्याने लग्न केलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता तो काळ्या रंगाचा शेरवानीमध्ये वराच्या रुपात दिसत आहे. सरफराज हा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. 

Related News

”काश्मीरमध्ये जाऊन लग्न करणं नशिबात होतं”

या लग्नाबद्दल सरफराज खानचं म्हणं आहे की, ”काश्मीरमधील माझी जोडीदार अल्लाने लिहिली होती. इथल्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं आहे. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी इथे नक्की येत राहीन”

”मी लवकरच भारतासाठी खेळणार”

सरफराज खान यांची कामगिरी पाहता चाहत्यांना त्याला भारतीय संघात पाहायचं आहे. मात्र अद्याप त्याला भारतीय संघात घेण्यात आलेलं नाही. भारतीय क्रिकेट संघातील निवडीबद्दल सरफराज म्हणाला की, अल्लाने नशिबात लिहिलं असेल तर मी लवकरच भारतीय संघात खेळून माझ्या खेळाची झलक देशवासियांना घडविणार आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता सरफराज खानची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी शोपियानमध्ये एकच गर्दी केली होती. सरफराज खानने रणजी आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 39 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 13 शतकं आणि 9 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 3559 धावा केल्या ठोकल्या आहेत. तर लिस्ट एमध्ये त्याने दोन शतकांच्या मदतीने 538 धावा केल्या आहेत. Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *