औरंगाबाद3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
1 ते 3 सप्टेंबर दरम्यान शहराचे तापमान सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सियसपर्यंत तापमान जास्त राहण्याची नोंद झाली आहे. तीव्र उन्हाच्या काहिलीने लोक घामाघूम होत आहेत. पावसाळ्यात उष्म्याने अंगाची लाही लाही वाढली आहे. यामुळे लोक हैराण झाले असून खरीप पिके पावसाअभावी जळू लागली आहेत.
ऑगस्टपासून एल निनोच्या प्रभाव सक्रीय झाला आहे. परिणामी मान्सूनचा पावसासाठी अनुकूल वातावरणच तयार होत नाही. सर्वदूर पाऊस पडत नाही. अनेक महसूल मंडळात सलग २१ दिवसांवर पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये यंदा प्रथमच सर्वात कमी पावसाची नोंद झाली. तर सप्टेंबरचा पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याऐवजी तीन दिवस सूर्य चांगलाच तळपला. सरासरीच्या तुलनेत पाच अंशांनी तापमान जास्त राहिले. म्हणजेच तीव्र उष्ण दिवसांची नोंद चिकलठाणा व भारतीय हवामान विभागाने नोंद घेतली आहे.
तापमान वाढीचे परिणाम
उन्हाची काहिली वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगात होत आहे. खरीप पिके सुकू लागली आहेत. लोक घामाघूम होत असून उकाड्याचा ञास असाह्य होत आहे. फॅन, कुलर, एसी, कृषी पंप सुरु झाले आहेत. विजेच्या मागणी व पुरवठ्याचे गणित बिघडून आपत्तकालीन भारनियमन सुरु झाले आहे.
हलक्या पावसाची शक्यता
हवामान विभागाने पुढील तीन दिवासांत शहरासह अनेक ठिकाणी जिथे पोषक वातावरण राहील अशा सर्व ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. विशेषत: पूर्व भागात पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे.