पुणेएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
पुणे शहरातील नर्हे, कोथरुड आणि कोंढवा परिसरातील सदनिकेतून चोरट्यांनी ६ लाख ७१ हजार रुपयांचा किंमचा मुद्देमाल चोरी केला. याप्रकरणी, सिंहगडरोड, कोथरुड व कोंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नर्हे येथील मयुर पवार (वय.३६) यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे, घड्याळ, चारचाकी गाडीची चावी असा २ लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी, पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिंहगड रोड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ ते ३ सप्टेंबर या कालावधीत घडली आहे.
विविध ठिकाणी घडल्या घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे त्यांच्या सदनिकेला कुलूप लावून बंद करून त्याच इमारतील असलेल्या दुसर्या सदनिकेत झोपायला गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी खालच्या सदनिकेचे लॉक तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर किंमती ऐवज चोरी केला. दरम्यान चोरट्यांनी त्याच बिल्डिंगमधील सदनिका क्रमांक पाच आणि तेराच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून आतप्रवेश केला आहे.
तर जिजाई नगरी कोथरुड येथील एका बंद सदिनकेतून चोरट्यांनी २ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे दागिणे चोरी केले. ही घटना रविवारी (दि.३) पहाटेच्यावेळी घडली आहे. याप्रकरणी, सुरज दामरे (वय.३५) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादींच्या भावाची सदनिका कुलूप लावून बंद असताना, चोरट्यांनी आत प्रवेश करून बेडरुमधील कपाटाचे ड्रॉवर तोडून लॉकरमधील किंमतीचा मुद्देमाल चोरी केला.
कांतिनी अपार्टमेंट श्रद्धानगर कोंढवा येथील सदनिकेतून चोरट्यांनी साठ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिणे असा १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी, राकेश सुरवाडे (वय.४७,रा.कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादींचे मेव्हणे योगेश गवई यांची सदनिका बंद असताना,चोरट्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करून किंमतीचा मुद्देमाल केला आहे.