Tiger 3 Screening सकाळी 7 वाजल्यापासून, ५ पासून बुकिंग | महातंत्र
महातंत्र ऑनलाईन डेस्क : यशराज फिल्म्स या सणासुदीच्या हंगामात वायआरएफ स्पाय युनिव्हर्स चित्रपट, टायगर ३ चे स्क्रिनिंग (Tiger 3 Screening) करण्यास सज्ज आहे. सुपरस्टार सलमान खान आणि कॅटरिना कैफ स्टारर टायगर ३ दिवाळीच्या दिवशी, रविवारी, १२ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे! निर्मात्यांनी माहिती दिली आहे की, ते रिलीजच्या तारखेला देशभरात सकाळी ७ वाजल्यापासून चित्रपटाचे प्रदर्शन सुरू करतील! (Tiger 3 Screening)

संबंधित बातम्या –

तसेच, YRF ५ नोव्हेंबरपासून भारतात टायगर ३ चे आगाऊ बुकिंग सुरू करणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रदर्शित होत आहे. टायगर ३ हा ब्लॉकबस्टर YRF स्पाय युनिव्हर्समधील 5 वा चित्रपट आहे. एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर आणि पठाण नंतर टायगर ३ येतोतय. याचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे.

YRF टायगर 3 हा YRF स्पाय युनिव्हर्स चित्रपटासाठी आतापर्यंतचा सर्वात विस्तृत रिलीज बनवण्याच्या मार्गावर आहे. हे हिंदी, तमिळ डब आणि तेलुगु डब वर्जनमध्ये रिलीज होईल. सकाळी ७ वाजल्यापासून टायगर ३ चे स्क्रिनिंग असणार आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *