आज मुख्यमंत्री शिंदेंचीही डिनर डिप्लोमसी: महायुतीमधील सर्व घटक पक्षांना निमंत्रण, इंडिया आघाडीला टक्कर देण्याची रणनिती

मुंबई21 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होत आहे. ही बैठक सुरू होत नाही तोच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महायुतीतील सर्व घटक पक्षांची बैठक आज बोलावली आहे. त्यामुळे विरोधकांची आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आज रंगण्याची शक्यता आहे.

Related News

ठाकरेंसह आज शिंदेंकडूनही स्नेहभोजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीतील घटक पक्षांना 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी बैठकीचे निमंत्रण दिले आहे. दरम्यान, आज इंडिया आघाडीतील नेत्यांना उद्धव ठाकरेंकडून ग्रॅण्ड हयातमध्ये स्नेहभोजन दिले जाणार आहे. रात्री 8.30 वाजता या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर, याचवेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या डिनर डिप्लोमसीमध्ये महायुतीतील सर्व घटक पक्षही उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आघाडी व महायुतीच्या नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

निवडणूक येताच छोट्या पक्षांची आठवण

दरम्यान, महायुतीच्या बैठकीवर ठाकरे गटाने टीका केली आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनात म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला राज्यातील छोट्या घटक पक्षांची आठवण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून प्रमुख पक्षाकडून छोटय़ा घटक पक्षांना दुर्लक्षित करण्यात आले. मात्र, आता लोकसभा निवडणुका जवळ येत असल्याचे दिसताच भाजपला छोट्या घटक पक्षांची आठवण झाली आहे.

महायुतीच्या बैठकीत हे पक्ष राहणार उपस्थित

भाजप, शिंदे गट, अजित पवार गट, आरपीआयचे आठवले आणि जोगेंद्र कवाडे गट, बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, जन सुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे, प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आज महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

संबंधित वृत्त

मुंबईत I.N.D.I.A आघाडीची आज तिसरी बैठक:28 पक्ष येणार, लोगो आणि समन्वयक ठरणार, जागावाटपावरही चर्चा शक्य

विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (I.N.D.I.A.) ची तिसरी बैठक आजपासून मुंबईत सुरू होत आहे. ही बैठक दोन दिवस (31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर) चालेल. या बैठकीला 28 पक्षांचे सुमारे 63 नेते उपस्थित राहणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच, समन्वयकाचीही घोषणा होऊ शकते. बैठकीत जागावाटपावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. कोणता पक्ष, कुठून, किती जागांवर निवडणूक लढवणार (सीट वाटप) हे ठरवणे सर्वात आव्हानात्मक असणार आहे.कारण आघीडीतील अनेक पक्ष अनेक राज्यांत एकमेकांच्या विरोधात आहेत. वाचा सविस्तर

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *