आज भारत-विंडीज तिसरा टी-20: टीम इंडियावर आता मालिका पराभवाचे सावट! सलग दोन लढतींत लाजिरवाणा पराभव

दिव्य मराठी नेटवर्क | प्रोव्हिडेन्सएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

सुमार फलंदाजीने सलगच्या दोन सामन्यांत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जाणाऱ्या टीम इंडियावर आता दौऱ्यावर टी-20 मालिका गमावण्याचे सावट आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारताचा या यजमान विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत सलग दोन लढतीत पराभव झाला. टीम इंडिया आणि विंडीज संघांमध्ये आज मंगळवारी मालिकेतील तिसरा सामना होणार आहे.

Related News

यातील पराभवाने टीम इंडियाला ही मालिका गमवावी लागणार आहे. आता दोन विजयांसह विंडीज संघाने पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. दर्जेदार गोलंदाजी आणि फलंदाजीच्या बळावर विंडीज संघाने घरच्या मैदानावरील या मालिकेत आघाडी घेतली. आता पोवेलच्या नेतृत्वाखाली मालिका विजयासाठी यजमान संघाने कंबर कसली आहे. सामनावीर निकोलस पुरनचे (67) अर्धशतक आणि शेफर्ड, जोसेफ, हुसेनची (प्रत्येकी 2 विकेट) शानदार गोलंदाजीतून विंडीज संघाने रविवारी याच मैदानावर टीम इंडियाचा पराभव केला. विंडीजने 18.5 षटकांत 2 गड्यांनी सामना जिंकला. या सलगच्या विजयाने आता विंडीज टीमच्या युवा खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे.

तिलक फॉर्मात; अनुभवी कोमात :

भारताचा युवा फलंदाज तिलक वर्मा पदार्पणापासून फाॅर्मात अाला अाहे. यातूनच त्याने अापल्या दुसऱ्याच टी-२० सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र, अनुभवी फलंदाज काेमात गेल्याने टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. मालिकेतील सलग दाेन सामन्यात कर्णधार हार्दिक, संजू सॅमसन, शुभमन गिल अाणि सूर्यकुमार यादव हे सपशेल अपयशी ठरत अाहेत. संघाचा डाव सावरणारी मधली फळीच कमकुवत ठरत अाहे. यामुळे संघाने सलग दाेन सामने गमावले अाहेत.

गाेलंदाजी काैतुकास्पद :

भारतीय संघाचा युजवेंद्र चहल सध्या फाॅर्मात अाहे. त्याने मालिकेतील सलग दाेन सामन्यांत प्रत्येकी २ बळी घेतले. त्याचबराेबर अर्शदीप सिंग, मुकेश कुमारही चांगली गाेलंदाजी करत अाहेत. हार्दिकनेही गाेलंदाजी करत दुसऱ्या सामन्यात ३ बळी घेतले. गत दुसऱ्या सामन्यात कुलदीपला विश्रांती देण्यात अाली हाेती. मात्र, अाता त्यालाे संधी दिल्या जाण्याची शक्यता अाहे.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *