जत : कागनरी येथे वाटमारी करणाऱ्या दोघास अटक; उमदी पोलिसांची कारवाई | महातंत्र
जत; महातंत्र वृत्तसेवा : कागनरी (ता.जत) येथे एका कुरियर कंपनीच्या कर्मचाऱ्यास रस्त्याने जात असताना मारहाण करत त्याच्याकडील ३ हजार ७०० रुपयेची लूट करण्यात आली होती. याबाबत उमदी पोलिसात बाळासो केंचाप्पा टीळे यांनी फिर्याद दिली होती. ही घटना २८ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली होती.

उमदी पोलिसांनी या घटनेसह आरोपीकडून तीन एका चोरीसह ३ मोटरसायकली चोरीचा छडा लावला आहे. याप्रकरणी विकास भिवा शिंदे (वय २५) व बाळासो रामा मोटे (वय ३२, दोघेही रा. मोटेवाडी ता.जत) यांनी उमदी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडील ३ हजार ७०० रकमेसह ३ मोटरसायकली ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात बेळोंडगी येथील एका महिलेस मारहाण करत चोरी केल्याची कबुली ही आरोपींनी दिली आहे. पोलिसांनी न्यायालयासमोर आरोपींना उभे केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता एका कुरिअर कंपनीचे डिलिव्हरी कर्मचारी बाळासाहेब टिळे हे कागनरी येथून रस्त्याने जात होते. दरम्यान एका शाळेसमोरून दोघे अज्ञात व्यक्तीनी विना क्रमांकाच्या मोटरसायकलवरून येऊन मारहाण करत जवळील कुरिअरचे पार्सल साहित्य काढत रोख रक्कमेची लूट केली होती. फिर्यादी टीळे हे आरोपींना ओळखत नव्हते. त्यामुळे तपासात अडचणी येत होत्या परंतु उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी दिलेल्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पोलीस उपनिरीक्षक शिरीष शिंदे, कपिल काळेल, प्रशांत माळी यांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी गोपीनीय माहिती नुसार मोटेवाडी येथीलच विकास शिंदे व बाळासो मोटे हे मोटरसायकलून पार्सल डिलिव्हरीची बॅग घेऊन जाताना दिसले आहेत. अशी माहिती मिळाल्याने तात्काळ पथक त्या ठिकाणी पोहोचले या पथकाने त्यांच्या ताब्यातील ३ मोटरसायकल जप्त केल्या. आणखी त्यांच्याकडील अन्य दोन गुन्हे दाखल असलेले उघडकीस झाले आहेत.उमदी पोलिसांनी या वाटमारी सारख्या घटनेचा कमी वेळेत सखोल तपास करत छडा लावल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *