मराठा आरक्षणासाठी 24 तासात दोन आत्महत्या, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीचा लढा आता दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्यावं, सरकारने मजा पाहू नये असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिलाय. उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू होणार असून, गावागावात आमरण उपोषण (Hunger Strike) केलं जाणार आहे. आमरण उपोषणात कुणाचा जीव गेल्यास सरकार जबाबदार असेल असं जरांगे म्हणालेयत. तर आरक्षणासाठी मराठा आमदार, खासदारांनी एकत्र यावं. समाजासाठी आमदार, खासदार मंत्री एकत्र येणार नाहीत त्यांना गावबंदी केली जाईल, बाहेर फिरूही देणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय.

आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्या
एकीकडे आंदोलन तीव्र होत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी (Marahta Reservation) तरुणांच्या आत्महत्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीए. बीडच्या अंबाजोगाईच्या गिरवली गावाक मराठा आरक्षणासाठी 42 वर्षीय व्यक्तीने पाण्याच्या टाकीवरून उडी मारत आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोरच घडला. या तरुणाच्या आत्महत्यनेतंर मराठा समाज आक्रमक झाला, मृतदेह छत्रपती शिवाजी चौकात ठेऊन मराठा समाजाने आंदोलन केलं. 

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली इथं एका 42 वर्षांच्या व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी पाण्याच्या टाकीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मराठा समाजाने त्या व्यक्तीचा मृतदेह अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठेवला आणि आंदोलन सुरु केलं.  मृत तरुणाचं नाव शत्रुघ्न काशीद असं होतं. मराठा आरक्षणासाठी शत्रुघ्न पाण्याच्या टीकावर चढले. पोलसांनी त्यांना खाली उतरण्याची विनंती केली. पण शत्रुघ्न यांनी पोलिसांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केलं. एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा देत शत्रघ्न यांनी पाण्याच्या टाकीवरुन थेट खाली उडली मारली. यात शत्रुघ्न यांचा जागीच मृत्यू झाला.

Related News

शत्रुघ्न काशीद यांनी आत्महत्या केल्यानंतर गावातील मराठा समाज आक्रमक झाला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. शत्रुघ्न काशीद यांच्या पश्चात आईृ-वडिल, पत्नी आणि दोन मुलं आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात काशीद यांचा सक्रीय सहभाग होता. 

चोवीस तासात दुसरी आत्महत्या
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी चोवीस तासात आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे.  श्री क्षेत्र आळंदी इथल्या इंद्रायणी नदीत मराठा सेवकाने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली होती.  व्यंकट नरशिंग ढोपरे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते 60 वर्षांचे होते. लातूर जिल्ह्यातील उंबरदरा गावचे ते माजी सरपंच होते. सध्या पुणे जिल्ह्यातील नरे आंबेगाव इथं वास्तव्यास होते. इंद्रायणी नदीत उडी मारल्याची बातमी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

रात्री आठ वाजल्यापासून पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली. आळंदी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहिम सुरु केली. आज दुपारी त्यांचा मृतदेह सापडला. Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *