महातंत्र ऑनलाईन डेस्क : मुंबईत आज ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केल्या. भारतासह महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सध्य स्थितीवर बोलत असताना महाराष्ट्रात दुहीची बिजं पेरत असल्याची टीका भाजपवर केली. तसेच त्यांनी माझा पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध नाही तर त्यांच्या वृत्तीला विरोध असल्याचे यावेळी स्पष्टपणे सांगितले. (Uddhav Thackeray)
औरंगजेबाच्या आक्रमणाचा दाखला देत ते म्हणाले की, भगव्यावर चाल करुन येणारींची महाराष्ट्राने थडगी बांधली आहेत. याच विधानाचा संदर्भ देत ठाकरेंनी भाजपवर देखील टीका केली. ते म्हणाले की, तुम्ही देखील चाल करुन आला तर याद राखा असा इशारा त्यांनी भाजपला दिला. महाराष्ट्राला पराक्रम शिकवावा लागत नाही असं देखील ते यावेळी म्हणाले. आताची ही औरंग्याची औलाद आम्ही खपवून घेणार नाही. औरंगजेबाची औलाद महाराष्ट्रात बसू देणार नाही. ही औरंग्याची वृत्ती तुमची आमची नाही असंही ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray)
पाठीत वार करणाराचा कोथळा काढावाच लागेल
पुढे ते म्हणाले की, कोणत्याच चळवळीत ठाकरे घराणे मागे नव्हते. प्रबोधनकारांना अंधश्रद्धेचा तिटकारा होता. याचा आढावा देत स्वातंत्र्यलढ्यात तुम्ही कोठे होता असा सवाल देखील ठाकरेंनी भाजपला केला. भाजपने मित्र बनून पाठीत वार केला आहे. पाठीत वार करत असाल कोथळा काढावाच लागेल. भाजपचा आता काँग्रेसवर डोळा आहे. त्यामुळे यांच्या पक्षात सगळे आयराम आहेत अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. दुहीची बिजं भाजप महाराष्ट्रात रुजवत आहे आणि हेच दुर्दैव आहे. फोडा आणि राज्य करा हे त्यांचं धोरण आहे.
भाजप हे कपडे धुण्याचे मशीन
भाजप हे कपडे धुण्याचे मशीन आहे. ज्यांना कपडे धुवायचे आहेत ते भाजपमध्ये जा अशी खोचक टीका देखील त्यांनी यावेळी केली. मतांसाठी भाजप काहीही करु शकते. एनडीएमध्ये सध्या फक्त तीनच पक्ष मजबूत आहेत असं देखील ते यावेळी म्हणाले.
मोदींना ठाकरेंचे आव्हान
गेल्या काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राने एक बातमी दिली होती. पंतप्रधान आता मुस्लीम महिलेकडून राखी बांधणार. बांधा, पण त्याआधी मणिपूरमधील त्या महिलेकडून प्रथम राखी बांधा. हिंमत असेल तर बिल्कीस बानोकडून राखी बांधावी, असे आव्हान देखील त्यांनी केले आहे.
ब्रिटीशांकडूनही भारताचा विकास पण…
ब्रिटीशांनाीही भारताचा विकास केला होता. सीएसएमटी, मनपा कार्यालय ब्रिटिशांनी बांधलेलं आहे. पण विकासासोबत स्वातंत्र हवं होतं म्हणून ब्रिटिशांविरोधात चले जाव चळवळ केली. असं म्हणत ठाकरेंनी भाजपच्या सध्य स्थितीतील राजकारणावर टीका केल्या.
हेही वाचा