उद्धव ठाकरे ‘इंडिया’चा PM पदाचा चेहरा?: हो.. बरोबर.. उद्या जातो अन् शपथ घेतो; INDIA च्या PC तील ठाकरेंच्या विधानाने चर्चेला ऊत

मुंबई37 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाचा चेहरा होणार का? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. पत्रकारांनी बुधवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत थेट ठाकरेंना यासंबंधीचा प्रश्न केला असता त्यांनी त्यावर हो, बरोबर, उद्या जातो आणि शपथ घेतो, अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यांनी हे विधान हसत – हसत केले असले तरी त्यामुळे अटकळींचा बाजार चांगलाच गरम झाला आहे.

Related News

उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचे वैशिष्ट आहे, आम्ही ज्यांच्यासोबत असतो त्यांच्यावर टीका करतो. भाजपसोबत असताना भाजपवर टीका करायचो, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे याबाबतचे वक्तव्य केल्यानंतर जोरजोरात हसू लागले. त्यानंतर बाजूला बसलेले शरद पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले.तुम्ही तुमच्या मीडियातून टीका केली म्हणून आम्ही आमचे काम करायचे थांबवायचे का? तुम्ही तुमचे काम करा, आम्ही आमचे काम करतो, असे शरद पवार म्हणाले.

उद्या जातो, शपथ घेतो

यावेळी उद्धव ठाकरे यांना आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करावे, अशी मागणी केली जात आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हो, बरोबर, उद्या जातो, शपथ घेतो, अशी मिश्लिक प्रतिक्रिया दिली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीचा संयोजक कुणाला ठरविण्यात येणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी याबाबत दोन दिवसांनी बैठक पूर्ण झाल्यावर माहिती देऊ, अशी प्रतिक्रिया दिली.

तेव्हा हे सरकार गॅसही मोफत देईल

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आंबेडकरांच्या वंचितसोबत आमची युती आहे. इंडियात येण्याची प्रकाश आंबेडकरांची इच्छा आहे का हे विचारावे लागेल. उद्धव ठाकरे यांनी यावेळी आमची प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीशी युती असल्याचेही स्पष्ट केले. आमची प्रकाश आंबडेकरांच्या वंचितशी युती आहे. त्यांना इंडिया आघाडीत त्यांना घेण्याच्या मुद्यावर चर्चा जाईल. पण त्यांची या आघाडीत येण्याची इच्छा आहे का, ते विचारावे लागेल. केंद्राच्या गॅसच्या दरात 200 रुपयांची कपात करण्याच्या निर्णयावरही उद्धव ठाकरे यांनी यावेळी निशाणा साधला. विरोधकांच्या वाढत्या ताकदीमुळे केंद्र सरकार गॅसवर गेले आहे. इंडिया आघाडीची ताकद वाढेल, तेव्हा हे सरकार गॅसही मोफत देईल, असे ते म्हणाले.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *