हे निर्घृण सरकार!: आंदोलकांच्या केसालाही धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र येथे आणून उभा करेन; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आता जर आंतरवाली सराटी गावातील लोकांच्या केसाला जरी धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र येथे उभा करेन, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राज्यसरकारला दिला आहे. पोलिसांनी कोणाच्या आदेशाने हे कृत्य केले त्याचा देखील तपास लागला पाहिजे. सरकारने चुकीच्या लोकांशी टक्कर, पंगा घेतला आहे. मराठवाडा ही संतांची भूमी आहे तशीच वीरांची देखील भूमी आहे, हे राज्यकर्त्यांनी विसरू नये, त्यांच्यासोबत पंगा घेऊ नका, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

आंतरवाली जराटी या गावात उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांनी व मराठा आंदोलकांशी संवाद साधला.

आंतरवाली जराटी या गावात उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांनी व मराठा आंदोलकांशी संवाद साधला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील आंतरवाली सराटा गावात चार दिवसांपासून शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी अमानुष लाठीमार केला. त्याचे संतप्त पडसाद आता राज्यभरात उमटत आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रात्री त्या आंदोलकांची भेट घेतली व त्यांच्यांशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार संजय राऊत आदी नेत्यांची उपस्थिती होती.

हे सर्वसामान्यांचे नव्हे सरकार निर्घृण

आंदोलकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या आज उगवल्या असे नाही. तुमच्या समाजाचा भावनेचा आदर करून आम्ही काम करत होतो. तेव्हा देखील लढा सुरू होता. अगदी आझाद मैदानात उपोषण झाले. तेव्हा लाठ्या काठ्या उगारल्या गेल्या नव्हत्या. तसेच उगारू दिल्या नव्हत्या. शक्य नव्हते तेव्हा व्हिडिओ द्वारे संपर्क साधला. पण हे सरकारच निर्घृण सरकार आहे.

विशेष अधिवेशनात प्रश्न मार्गी लावा
ज्याप्रमाणे दिल्लीचा प्रश्न मार्गी लावला. मग मराठा समाजाचा प्रश्न मार्गी का लावला जात नाही. ज्याप्रमाणे कोर्टाचा निकाल दिला असला तरी देखील दिल्लीतील अद्यादेशाचा विषय कायदा करून अंमलात आणला. अगदी तसेच संसदेच्या विशेष अधिवेशन काळात मराठा समाजाला न्याय मिळणार का? मोदी सरकार कायदा करणार का?

म्हणून आंदोलकांवर हल्ला केला असावा

एक फुल दोन हाफ सरकारचा एक कार्यक्रम या ठिकाणी येणार आहे. त्याचे नाव होतो, सरकार आपल्या दारी. तेव्हा ये आंदोलन नको म्हणून सरकारकडून अशाप्रकारे तुमच्यावर म्हणजे आंदोलकांवर हल्ला केला असावा, अशी चर्चा आहे.

मी आलो मग ते का येऊ शकत नाही
माणुसकीच्या नात्याने तुमची विचारपूस करायला आलो आहे. वातावरण तापलेले आहे. पण बघूना माझे सर्व बांधव आहेत. त्यांच्यावर माझा अन माझा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी या ठिकाणी आलो आहे. मग मी येऊ शकतो पण ट्रिपल सरकार का येऊ शकत नाही.

ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेतली.

ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेतली.

मग वरचा फोन कोणाचा सखोल
सखोल आदेश दिले आहेत. किती खोल जाणार आहेत. मोर्चाची मागणी मुख्यमंत्र्यांना दिली जाते. मग वरचा फोन कुणाचा होता, हे देखील आम्हाला कळले पाहिजे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी शिंदे यांचे नाव न घेता विचारला. गोवारी हत्याकांडात मधुकर पिचड यांचा राजीनामा घेतला होता. मग फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी देखील ठाकरेंनी केली.

ही कोणती लोकशाही?
मुंबईत आरेचे आंदोलन, कोकणात देखील आंदोलकांना मारले जाते. ही कोणती लोकशाही आहे. आगीत तेल ओतण्यासाठी आलेलो नाही, दिलासा देण्यासाठी आलो आहे.

गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घ्या
गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले ते मागे घेतले गेलेच पाहिजे, अशी मागणी आग्रहाची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. स्वाभीमानाची ज्योत पेटवून देण्यासाठी आम्ही येतो आले आहे. संयम, धीर खचू द्यायचा नाही. शांततेच्या मार्गाने दिला आहे. खास अधिवेशनात नवीन संसदेत गणरायाच्या साक्षीने या समाजाला न्याय द्या, अशी मागणी ठाकरेंनी केली.

अशोक चव्हाणांचा सरकारवर घणाघात
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, आपल्या गावात जो अमानुष लाठीहल्ला झाला. तेव्हा आम्ही मुंबईत होतो. दुर्दैवीची बाब अशी आहे की, सदनशील मार्गाने आंदोलन करणारे जरांगे पाटील हे प्रामाणिक माणूस आहे. गावात लाठीहल्ला होतो, एवढ्यावर वेळ येण्याची गरज काय? शासनाचे प्रमुख लोक आले असते त्यांनी समजून सांगितले असते तरी हा प्रश्न लोकांनी समजून घेतला असता. मराठवाडा हा आमच्या नशीबी लाठ्या काठ्याच आहेत का. आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे सरकार करत आहे. विशेष अधिवेशनात कायदा बदला आणि मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे. कायद्यामध्ये बदल करा,

‘वन नेशन व्हाट अबाऊट आरक्षण’ असा प्रश्न सरकारला आहे. तातडीने आपण गेलो पाहिजे, महाविकास आघाडीची भूमिका काय, जी समाजाची भूमिका तीच आमची भूमिका आहे. आपल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

अंबडच्या शासकीय रुग्णालयात भेट

आंतरवाली सराटा गावातील आंदोलकांशी भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अंबड शासकीय रुग्णालयात जखमी झालेल्या आंदोलकांशी संवाद साधला. तुमची तब्येत चांगली होऊ द्या, काळजी घ्या, शांतता, संयम ठेवून प्रश्न मार्गी लावले जातील, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला.

हे ही वाचा

कुणाच्या सांगण्यावरुन आंदोलकांवर लाठीचार्ज?:एक फुल दोन हाफ पैकी कुणाकडेही आंदोलकांना भेटण्यासाठी वेळ नाही; उद्धव ठाकरेंची टीका

एक फुल आणि दोन हाफला आंदोलकांची भेट घ्यावी वाटली नाही. आंदोलकांवर काल जो शासकीय अत्याचार झाला त्यावर केवळ निषेध करुन होणार नाही. जालन्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्यायचा होता म्हणून आंदोलन चिरडण्याचा निर्णय घेतला असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर केला आहे. – येथे वाचा संपूर्ण बातमी

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *