उद्धव ठाकरेंचा जालनामध्ये राज्य सरकारला इशारा; ‘मराठा आंदोलकांच्या केसाला जरी धक्का लागला तर…’ | महातंत्र








वडीगोद्री, महातंत्र वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील अतंरवाली सराटी येथे शुक्रवारी (दि.१) झालेल्या लाठीचार्ज तसेच गोळीबाराचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज तसेच गोळीबाराबद्दल गोळीचे काडतूस हातात घेऊन चर्चा केली. झाल्या प्रकाराबद्दल शासनाच्या विरोधात ताशेरे ओढले आणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,माजी मंत्री आ.राजेश टोपे, खा सजंय राऊत, खा. बंडू जाधव, माजी खा. चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, नराठा आरक्षणाची मागणी आजची नाही.तेव्हाही लढा सुरु होता,पण काठीचार्ज आणी गोळीबार झाला नाही. तुम्ही या आंदोलन कर्त्यांना दोन वेळा वर्षांवर बोलावलं. आणी लवकरच आरक्षणाबाबत समिती गठन करून आरक्षण देऊ असे मिंधे बोलले होते. मग त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळेच मराठा आंदोलक आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यांची काय चुक होती. त्यांची मागणी रास्त होती. मग त्यांच्यावर लाठीचार्ज आणी गोळीबाराचे आदेश दिले कोणी?

माझ्या नराठा समाज बांधवाच्या ज्या मागण्या आहेत.तुम्ही त्या मान्य करा. माझ्या मराठा बांधवाना न्याय मिळाला पाहिजे. हे सरकार निर्घून आहे. यांच्यात माणुसकी उरली नाही. हे हिंदूंच्या सणाला आडवं येणार सरकार आहे. मविआ सरकारच्या कळातही आंदोलन झाली. मात्र असे भ्याड हल्ले झाले नाहीत. मराठा समाजाच्या मागण्याचा आदर करा.

अंबड तालुक्यात आंदोलन करणारी मंडळी चिन,पाकिस्तानातुन आलेली नाहीत,ही या मातीतील माणस आहेत,यांना त्यांचा हक्क द्यावाच लागेल. शांतता प्रिय आंदोलन सुरु असतांना असा भ्याड हल्ला होतीच कसा. याची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे. पोलिसांना हे आदेश कोणी दिले याची चौकशी व्हायलाच पाहिजे. जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेतले पाहिजेत. आणी पून्हा गुन्हे दाखल होता कामा नयेत.









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *