मी उद्या शपथ घ्यायला जातोय….उद्धव यांच्या मिश्किल टिप्पणीने पवारांच्या चेहऱ्यावर हसू उमटले

मुंबई : विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची बैठक (India Meeting) उद्यापासून मुंबईत (Mumbai) आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीच्या आधी आज महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. आजच्या या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), अशोक चव्हाण (Ashok Chavan), शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या काही प्रश्नांवर टोलेबाजी केली. एका प्रश्नावर त्यांनी दिलेल्या उत्तरावर शरद पवार यांच्यासह उपस्थितांनाही हसू आवरले नाही.

विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये देशभरातील 28 पक्षांचा समावेश आहे. यातील काही पक्षांकडून आपल्या नेत्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सूचवले जात आहे. आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना तुमचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवलं जात असल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना उद्धव यांनी मी उद्याच शपथ घेण्यासाठी जात असल्याची मिश्किल टिप्पणी केली. उद्धव ठाकरे यांच्या हजरजबाबीपणाने पत्रकार परिषदेत एकच हास्यकल्लोळ उडाला. 

Related News

सामनातील टीका…. 

‘दैनिक सामना’तील अग्रलेखातून शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली जाते. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर, पवार यांनी उत्तर देण्याआधी उद्धव ठाकरे यांनी मिश्किल उत्तर दिले. आम्ही ज्यांच्यासोबत असतो त्यांच्यावर टीका करतो. आधी भाजपवरही टीका करायचो असेही उद्धव यांनी म्हटले. 

 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली. भारत मातेचं रक्षण करण्यासाठी एकत्र आलो आहोत. संविधानाचे रक्षण करणे, देशातील हुकूमशाही दूर करणे हे उद्दिष्ट्य असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. मुंबईतून ब्रिटिशांविरोधात ‘चले जाव’चा नारा देण्यात आला होता. ब्रिटिशही विकास करत होते. पण त्यांनाही चले जाव म्हटले. आम्हाला विकासासोबत स्वातंत्र्य, लोकशाही हवी आहे. आता सरकारला पुन्हा ‘चले जाव’ सांगायचे आहे. उद्याच्या बैठकीत काय होणार याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सूचक वक्तव्य केले. उद्यापासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या बैठकीत इंडिया आघाडीत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झाल्या असून आता आघाडीचा कार्यक्रम ठरणार असल्याची शक्यता पवारांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *